Team Agrowon
अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत.
पुणे विभागात आडसाली, पूर्व हंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे सरासरी तीन लाख ६१ हजार ५३८ हेक्टर क्षेत्र आहे.
पुढील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत दोन लाख ८४ हजार ९३० हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात शेतकऱ्यांनी खोडवा उसाचे क्षेत्र राखल्यास उसाच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात झालेल्या मुबलक पावसामुळे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत यांसह अनेक धरणांत पाण्याची चांगली उपलब्धता आहे.
यंदा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला.
पुणे विभागातील नगर जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत.