farmer protest Agrowon
ताज्या बातम्या

Drought Condition : भोकरदनमध्ये दुष्काळ जाहीर करा ; शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Drought in Jalna : निम्मा पावसाळा संपला तरी, जालना जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाचा हंगाम वाया जात असल्याने शेतकऱयांचे आर्थिकचक्र कोलमडले आहे. याप्रश्नी राज्य शासनाने लक्ष घालून तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Team Agrowon

Jalna news : संपूर्ण जालना जिल्ह्यात पावसाचा खंड पडलेला असूनही फक्त ८ मंडळांत खंड पडल्याचे सर्वेक्षण कृषी खात्याने दिले आहेत. त्यातही भोकरदन तालुक्यातील एकही मंडळ यामध्ये समाविष्ट नसल्याने शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या २५ दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने मका, सोयाबीन, कपाशी सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच पिकांनी माना टाकायला सुरुवात केली असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. चालू वर्षीचा पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यास पीकविमा कंपन्यांना २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी लागते असा नियम आहे.

महिनाभरापासून भोकरदन तालुक्यात पाऊस पडलेला नसतांना ही मंडळे का वगळली असा प्रश्न शेतकऱ्यांनी तहसीलदार संतोष बनकर यांच्याकडे मांडला. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन घोषणाबाजी केली.तसेच तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा.

तसेच भोकरदन तालुक्यातील हजारो शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत. तसेच हसनाबाद व आन्वा मंडळातील ४० गावांतील शेतकऱ्यांना देखिल १९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. मात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कधी?

या वेळी बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, शिवसेनेचे माधवराव हिवाळे, छावा संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता ठाले, युवक काँग्रेसचे राहुल देशमुख, तालुकाध्यक्ष त्र्येंबक पाबळे, प्रहारचे नारायण मिसाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काकासाहेब साबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलिसांचाही बंदोबस्त होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Crop: आंबा उत्पादनात ५० टक्के घट होण्याचा अंदाज

Maize Farmers: मका उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

Cotton Purchase: हमीभावाचा आधार नाही; कापूस गेला कमी दरात

Animal Market Action: लकडगंजमधील वन्यजीवांच्या बेकायदा बाजारावर होणार कारवाई

Natural Farming: नांदेडला डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाला गती

SCROLL FOR NEXT