Sugarcane Supply  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Supply : जीवघेण्या स्पर्धेमुळे ऊस पुरवठ्याची शाश्वती संपली

बी.बी. ठोंबरे; हंगाम १४५ दिवस चालविण्याचा सल्ला

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Sugarcane Update : पुणे ः ‘‘साखर उद्योगात (Sugarcane Industry) जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे गाळपासाठी पुरेसा ऊस मिळण्याची शाश्वती आता राहिलेली नाही.

त्यामुळे यापुढे १४५ दिवसांपर्यंत हंगाम न चालविल्यास व उपपदार्थांवर लक्ष न दिल्यास राज्यातील खासगी साखर कारखान्यांना (Private Sugarcane Factory) आर्थिक स्थैर्य मिळणार नाही,’’ असा इशारा वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिला.

‘विस्मा’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ठोंबरे बोलत होते. ‘विस्मा’चे सरचिटणीस पांडुरंग राऊत, कार्यकारिणीतील पदाधिकारी रोहित नारा, माधवराव घाडगे, महेश देशमुख, कार्यकारी संचालक अजित चौगुले उपस्थित होते.

“सहकारात बंधुभाव व आपलेपणा ही तत्त्वे आहेत. त्याबळावर सहकारी साखर कारखान्यांना शेतकरी हमखास ऊस पुरवठा करतात. मात्र, तशी स्थिती खासगी साखर कारखानदारीमध्ये नाही. खासगी कारखान्यांची अजूनही सहकारासारखी उत्पादकांशी थेट जोडणी झालेली नाही आणि हीच मोठी उणीव राहिलेली आहे.

सहकारातील साखर कारखानदारीतील हा आपलेपणाचा धागा खासगी साखर उद्योगातदेखील आणावे लागेल. त्याचबळावर आमच्या खासगी नॅचरल शुगरने गाळपाचे दिवस १६५ पर्यंत नेण्यात यश मिळवले,” असे श्री. ठोंबरे यांनी स्पष्ट केले.

“गेल्या चार वर्षांत साखर उद्योगाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. हंगामाचे दिवस वाढविण्यासाठी ऊस विकासाचा व्यापक कार्यक्रम प्रत्येक कारखान्याला हाती घ्यावा लागेल. कारण, जीवघेण्या स्पर्धेत हमखास कच्च्या मालाच्या पुरवठ्याची शाश्वती आता कोणालाही राहिलेली नाही.

सर्व कारखाने गाळप क्षमता वाढवत आहोत; पण ऊस उपलब्धतेकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे ऊस विकासाचे कार्यक्रम राबवावेच लागतील. नव्या आव्हानांना तोंड देत व संधीचा लाभ घेत खासगी कारखान्यांना आपल्या वाटचालीत परिवर्तन आणावे लागेल,” असा सल्ला श्री. ठोंबरे यांनी दिला.

‘विस्मा’च्या खासगी साखर कारखान्यांना टिप्स
- हंगाम १४५ दिवस चालवण्यासाठी नियोजन करा
- ऊस उत्पादन वाढीसाठी काय करतोय याची माहिती शेतकऱ्यांना द्या
- इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करा


- कारखान्यातील तंत्रज्ञांनीही प्रयोग करावेत
- सिरप साठवण्यासाठी संशोधन हवे


- बॉयलर अॅशमधून पालाश मिळविण्यासाठी संशोधन वाढवा
- साखर उत्पादन घटवून उपपदार्थांवर भर द्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT