ST Strike  Agrowon
ताज्या बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंतची मुदत

उच्च न्यायालयाचे आदेश; परिवहनमंत्र्यांचा निलंबनाचा इशारा

ॲग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून संपावर (ST Strike) असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employee) २२ एप्रिलपर्यंत कामावर परतण्याची मुदत मुंबई उच्च न्यायालयाने (High Court Mumbai) दिली आहे. कर्मचारी निर्धारित तारखेपर्यंत रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला.
एस. टी. महामंडळाचे (ST Mahamandal) राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याबाबत नेमलेल्या समितीने विलिनीकरणाबाबत नकारात्मक अहवाल दिला. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या नजरा कोर्टाच्या सुनावणीकडे लागल्या होत्या.

मात्र, गुरुवारच्या सुनावणीवेळी न्यायालयाने भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि पेन्शनबाबत आदेश देऊ, मात्र, सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरही कर्मचारी कामावर येणार नसतील, तर त्याबाबत सरकार(Government) निर्णय घेऊ शकते. २२ एप्रिलपर्यंत कर्मचारी कामावर रुजू होऊ शकतात. त्यांच्याविरोधात बडतर्फी, निलंबन अथवा अन्य कारवाया सुरू असतील, त्या मागे घेऊन समज देऊन त्यांना कामावर घेऊ, अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. मात्र, २२ तारखेनंतर जे कर्मचारी (Empoyee) कामावर येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांची सेवा समाप्त केली जाईल, असे परब म्हणाले.

गुन्हे असले तरी कामावर घेऊ
राज्य सरकारने उच्च न्यायालयात हमी देताना ज्या कर्मचाऱ्यांवर हिंसाचाराचे गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत, त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार नाही. संबंधित कर्मचाऱ्यावर ज्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत, त्याप्रमाणे जी कारवाई होईल, त्याप्रमाणे होईल. महामंडळ स्वतंत्र कारवाई करणार नाही, असे परब यांनी सांगितले.

‘जनतेला वेठीला धरू नका’
परब म्हणाले, ‘‘न्यायालयाने सातवेळा आदेश दिले, तरीही कर्मचाऱ्यांनी ऐकले नाही. महाराष्ट्रातील जनतेला वेठीला धरून आंदोलन करू नका. मागण्या करण्याचा पूर्ण हक्क आहे, पण नुकसान करून आंदोलन करू नका. आम्ही कारवाया मागे घेऊ, असेही कर्मचाऱ्यांना सांगितले होते, तरीही ऐकले नाही. कर्मचारी ज्यांच्या नादाला लागून ही भूमिका घेत आहेत, ते चुकीचे आणि घातक आहे.’’

गेल्या दोन वर्षांत कोविड काळात एसटीची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. देणी देण्याबाबत थोडेफार मागे पुढे झाले असेल, पण त्यात फारसा फरक पडला नाही. या संपामुळे मोठे नुकसान झाले आहे. अधिकचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने रुजू झाले पाहिजे.
- अनिल परब, परिवहन मंत्री.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT