Satara Dam agrowon
ताज्या बातम्या

Satara Rain Update : सातारा जिल्ह्यात धरणे अद्यापही ५० टक्क्यांवरच, संततधार पावसाची प्रतिक्षा

Team Agrowon

Satara Rain News : सातारा जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून हवामान विभागाकडून पुढचे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने धरणातील पाणीसाठा वाढत आहे. पावसाचा आणखी जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात सध्या ५९ टक्केच्या आसपास पाणीसाठी आहे. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. तसेच नवजा परिसरात मागच्या २४ तासांत अडीचशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तर मागच्या काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाने नवजा व महाबळेश्वरमध्ये तीन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा पार केला आहे. झालेल्या पावसाने मागील २४ तासांत कोयना धरणात ५ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

काल रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा परिसरात धो- धो पाऊस कोसळत असल्याने गेल्या २४ तासांत २५२ मिलिमीटर, कोयनानगर येथे १६२ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा ५८.८१ टीएमसी झाला आहे.

याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात ११ मोठ्या व मध्यम पाणी प्रकल्पांमध्ये सुमारे ९४ हजार क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक होत आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांत १५७.४८ टीएमसी पैकी ८९.६४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, धरणे भरण्यासाठी अद्यापही संततधार पावसाची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

सध्या कोयना धरणात ६० हजार ३९६ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून ५८.८१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर धोम धरणात ८ हजार ५३८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून ६.४८ टीएमसी पाणीसाठा आहे. धोम बलकवडी धरणात १ हजार ६९९ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक व ३.३६ टीएमसी पाणीसाठा आहे.

कण्हेर ८ हजार ५३ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून ४.७० टीएमसी पाणीसाठा आहे. उरमोडी धरणात ४ हजार ५० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून ४.७३ टीएमसी पाणीसाठा आहे. तारळी धरणात ४ हजार ९२८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू असून ५.०३ टीएमसी पाणीसाठा आहे.

या मोठ्या प्रकल्पांत सर्व मिळून १४०.८६ पैकी ७८ टीएमसी पाणीसाठा झाला असून त्याची टक्केवारी ५५.३८ इतकी आहे. मध्यम प्रकल्पांत अपवाद वगळता पाणीपातळी अतिशय खालावली आहे.

१० पैकी ५ धरणांमध्येच पाण्याची आवक सुरू आहे. त्यामध्ये वांग-मराठवाडी धरणाची २.७३ टीएमसी क्षमता असून १.९० टीएमसी पाणीसाठा आहे. हागेघर धरणाची ०.२६ टीएमसी क्षमता असून ०.०८८ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे. महू धरणाची १.१० टीएमसी क्षमता असून ०.८७१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उत्तरमांड धरणाची ०.८८ टीएमसी क्षमता असून ०.३८५ इतकाच पाणीसाठा आहे.

मोरणा - गुरेघर धरणाची १.३९ टीएमसी क्षमता असून ०.९०६ टीएमसी पाणी आहे. नागेवाडी धरणाची ०.२३ टीएमसी क्षमता असून त्यामध्ये ०.०६४ टीएमसी क्षमता आहे. सातारा, जावली आणि पाटण तालुक्यात पावसाचा जोर असल्यामुळे या मध्यम प्रकल्पांमध्ये ६ हजार १४२ क्युसेक्स प्रतिसेकंद इतकी पाण्याची आवक सुरू आहे. मोठ्या व मध्यम प्रकल्पांत १५७.४८ पैकी एकूण ८१.६४ टीएमसी पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पशुसंवर्धन विभागामार्फत रेबीज रोगप्रतिबंधात्मक लसीकरण

Farmer Incentive Scheme : कर्जमुक्ती प्रोत्‍साहन योजनेचा ४२४ शेतकऱ्यांना लाभ

Paddy Farming : चांगल्या पावसामुळे भातशेती बहरली

Solar Pump Scheme : मागेल त्याला सौर कृषिपंपांचा ५० हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

SCROLL FOR NEXT