Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : भरपाईपासून नुकसानग्रस्त वंचित

जळगाव तालुक्यातील भोकर, पिंप्राळा महसूल मंडळातील २१ गावांना ९, १० जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे २०९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः जळगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा, यावल, रावेर आदी भागांत जूनमध्ये वादळाने केळी व इतर पिकांना फटका (Crop Damage) बसला होता. यानंतर प्रशासन, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे व आश्वासने व निवेदनाचा रतीब झाला. परंतु शासनाकडून भरपाई (Crop Damage Compensation) अद्याप मिळालेली नाही.

फक्त पीकविमा धारकांना अलीकडेच किंवा काही दिवसांपूर्वी मदतनिधी मिळाला आहे. परंतु पीकविमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून काहीएक मदत मिळालेली नाही. जळगाव तालुक्यातील भोकर, पिंप्राळा महसूल मंडळातील २१ गावांना ९, १० जून रोजी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने दिलेल्या फटक्यामुळे सुमारे २०९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते.

यावल, रावेर, चोपडा, भडगाव, पाचोरा भागातही सुमारे पाच हजार हेक्टरला फटका बसला होता. यात बहुतांश केळीचे क्षेत्र बाधित झाले होते. या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी नेते, प्रशासनाने केली होती. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अनेक शेतकऱ्यांना आपल्या व्यथा-वेदना सांगताना अश्रू अनावर झाले. जळगाव तालुक्यात गाढोदा, भादली खुर्द, भोकर, पळसोद शिवार, कठोरा, करंज, घार्डी, नांद्रा बुद्रुक, नंदगाव आदींसह परिसरातील शिवारात थेट बांधावर जाऊन लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली होती. पपई, टोमॅटो, वेलवर्गीय पिकांसह शेडनेटलाही फटका बसला होता. यातील नुकसानग्रस्तही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

मदतीची प्रतीक्षा..

जिल्ह्यात २०१९, २०२० व २०२१ मध्येही अतिवृष्टी झाली. यात कापूस, उडीद, मूग, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. याबाबतही मदतनिधीची अपेक्षा होती. अहवाल, पाहणी दौरे या काळातही झाले. पण भरपाई मिळालेली नसल्याची स्थिती आहे. याद्या तहसील प्रशासनाकडे आहेत. पण निधी मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT