Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पावसामुळे खरीप पिकांना बाधा

गेले काही दिवस या भागात सतत पाऊस असल्याने शेतातील कामे विस्कळित झाली होती. सोबतच सलग पावसाळी वातावरणामुळे आता पिकांच्या नुकसानाची टक्केवारी वाढत चालली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः गेले काही दिवस या भागात सतत पाऊस असल्याने शेतातील कामे विस्कळित झाली होती. सोबतच सलग पावसाळी वातावरणामुळे (Rainy Climate) आता पिकांच्या नुकसानाची (Crop Damage) टक्केवारी वाढत चालली आहे. कपाशीच्या बोंडातून आधीच कोंब (Cotton Boll Sprouting) येऊ लागले तर परिपक्व होत असलेली सोयाबीन (Soybean), उडदाच्या शेंगामधूनही असे कोंब येण्याची शक्यता वाढत चालली आहे. त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यात पावसाने मोठे नुकसान केले आहे. या लगतच्या तालुक्यातही कपाशीचे दररोजच्या पावसाने नुकसान वाढत आहे. आता उडीद व सोयाबीन ही दोन पिके पावसाच्या तडाख्यात सापडण्याची चिन्हे आहेत. उडीद, सोयाबीनच्या झाडांवर शेंगा परिपक्व होण्याची प्रक्रीया सुरू आहे.

या शेंगामधील दाणे पावसाने अंकुरण्याची शक्यता वाढू लागली. सोयाबीनवर लष्करी अळी सर्वत्र आलेली आहे. कपाशीचे पीक बोंडअळीच्या तडाख्यातून कसेबसे सावरत असताना आता पुन्हा हे संकट येण्याची चिन्हे आहेत. उडदाचे पीक काढणीसाठी तयार होत आहे. शेंगा वाळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पावसामुळे निंदण, कोळपणी व इतर कामे ठप्प झालेली आहेत.

संग्रामपूरमध्ये दोन मंडलांत अतिवृष्टी

बुलडाणा जिह्यातील संग्रामपूर तालुक्याला आठवडाभरात सातत्याने पाऊस झोडपत आहे. या आठवड्यात दोन वेळा अतिवृष्टीचा तडाखा बसला. गेल्या २४ तासांतील पाऊस नोंदीनुसार सोनाळा व बावनबीर या दोन्ही मंडलांत ७९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वत्र अतिवृष्टी झाल्याची नोंद असून शिवाय संग्रामपूर मंडलात ३७.५, तर पातुर्डा मंडलात ३५.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT