Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Sitrang Cyclone : बंगालच्या उपसागरात ‘सितरंग’ चक्रीवादळ

बंगालचा उपसागरात रविवारी (ता.२३) सायंकाळी ‘सितरंग’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ही वादळी प्रणाली ईशान्य दिशेने जात आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालचा उपसागरात (Bay Of Bengal) रविवारी (ता.२३) सायंकाळी ‘सितरंग’ चक्रीवादळाची (Sitarang Cyclone) निर्मिती झाली आहे. ही वादळी प्रणाली ईशान्य दिशेने जात आहे. आज (ता. २५) सकाळपर्यंत बांगलादेशाच्या बरिसाल जवळ असलेल्या तिंकोना बेटे, सॅनद्वीप जवळ किनाऱ्याला हे चक्रीवादळ धडकणार आहे. याचा महाराष्ट्रावर कोणताही प्रभाव जाणवणार नाही, अशी माहिती मिळाली.

सुरूवातीला पूर्व किनाऱ्याकडे येणारी ही प्रणाली पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातून ईशान्य दिशेकडे वळली आहे. सोमवारी (ता. २४) रात्रीपर्यंत त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याचे संकेत आहेत. सोमवारी सकाळी या वादळाचे केंद्र पश्चिम बंगाल जवळील सागर बेटांपासून ३८० किलोमीटर दक्षिणेकडे, तर बांगलादेशाच्या बरिसाल पासून ५२० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होते.

‘सितरंग’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व, ओडिशा, पश्चिम बंगाल, बांगलादेशच्या किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली आहे. या भागासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच या वादळी प्रणालीमुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, बाग्लांदेशच्या किनाऱ्यालगत समुद्रात ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा, उंच लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.

किमान तापमानात घट

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा निरोप घेताच राज्यात निरभ्र आकाश झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे पहाटे गारठा जाणवू लागला आहे. आज (ता. २५) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, आता गुलाबी थंडीची प्रतीक्षा आहे.

रविवारी (ता. २३) रात्रीपासूनच राज्याच्या विविध भागात गारठा जाणवू लागल्याने थंडीची चाहूल लागली आहे. सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली आले. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २९.८ (१४.४), जळगाव ३३.७(१५.०), कोल्हापूर ३०.० (१८.६), महाबळेश्वर २४.५(१२.२), मालेगाव - (१८.६), नाशिक २९.५ (१४.२), सांगली ३०.२(१६.५), सातारा २८.८(१४.६), सोलापूर ३१.२ (१६.९), सांताक्रूझ ३४.३(२०.६), डहाणू ३३.८ (२०.४), रत्नागिरी ३४.५ (१९.२), औरंगाबाद २९.८ (१४.१), नांदेड २९.४ (१७.४), उस्मानाबाद ३०.६ (१८.५), परभणी ३०.६ (१७.०), अकोला ३३.४ (१८.०), अमरावती ३२.४ (१५.३), ब्रह्मपुरी ३३.० (१७.८), बुलडाणा २९.६ (१७.८), चंद्रपूर ३२.४ (१८.०), गडचिरोली ३०.०(१६.८), गोंदिया ३०.२ (१७.८), नागपूर ३१.४ (१७.०), वर्धा ३१.२(१७.०), यवतमाळ ३२.४ (१४.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT