PDCC Bank Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : पीककर्ज भरण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी

Agriculture Loan : चालू २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीककर्जाचे सुमारे चार हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune DCC Bank) शून्य टक्के व्याजाचा लाभ घेण्यासाठी आजचा (ता. ३१) अखेरचा दिवस आहे. त्यामुळे खरिपात हंगामात बँकेकडून घेतलेल्या कर्जाची (Crop Loan) रक्कम भरण्यासाठी गर्दी केली आहे.

थकित कर्जदार झाल्यास सभासदांना १२ टक्क्यांनी पीककर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. तर रब्बी हंगामासाठी कर्ज घेतलेली रक्कम भरण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली.

चालू २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीककर्जाचे सुमारे चार हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. यात खरिपासाठी सुमारे एक हजार ८०१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. तर पूरक व्यवसायासाठी अल्पमुदतीचे ११ कोटी ३३ लाख रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते.

त्यापैकी २ लाख ३२ हजार ३८९ सभासद शेतकऱ्यांना १ हजार ८४३ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपयांचे म्हणजेच १०२ टक्के पीककर्जाचे वाटप केले होते. हे पीककर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने दिले जात असून, ते पुन्हा ३१ मार्चच्या अगोदर भरणे आवश्यक असते. अन्यथा, संबंधित शेतकऱ्यांला जादा व्याजदराने पीककर्जाची रक्कम भरावी लागते, त्यामुळे कर्ज भरण्यासाठी बँकेत गर्दी होत आहे.

पुणे जिल्हा सहकारी बँकेने तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या शाखांमार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायटींना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात बँकेच्या जवळपास २९४ शाखांमधून शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येते.

जिल्ह्यात बँकेची खातेदार संख्या जवळपास तीन लाख ५ हजार ७९६ पर्यंत आहे. त्यापैकी जवळपास तीन लाख सभासद शेतकरी पीककर्ज घेतात. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्जांचे वाटप केले जाते. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT