Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : दीर्घ खंडामुळे पिके करपली

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत २५ दिवसांहून अधिक पावसाचा खंड पडला आहे. परिणामी, हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपून गेली आहेत.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत २५ दिवसांहून अधिक पावसाचा खंड (Long Periods Of Rain) पडला आहे. परिणामी, हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपून (Crop Burning) गेली आहेत. शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात (Soybean Production) मोठी घट येणार आहे. कपाशी (Cotton), तूर तसेच इतर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तत्काळ अधिसूचना काढावी. विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमाभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. परभणी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा १६८.३ मिलिमीटर एवढा कमी पाऊस झाला.

परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत २५ पेक्षा जास्त दिवस खंड पडला आहे. तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. हलक्या, बरड, मुरमाड, माळरानाच्या जमिनीवरील पिकांची पाने, फुले, शेंगा करपून गेली आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश मंडलांत २१ पेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड आहे. पीकविमा योजनेतील तरतुदीनुसार प्रतिकूल हवामान परिस्थिती नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम पीकविमा भरपाई द्यावी. प्रशासनाने तसे आदेश द्यावेत. वेळेत सर्व्हेक्षण करावे. शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
- विश्‍वंभर गोरवे, तालुकाध्यक्ष

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Alert: मराठवाड्यात पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पुढील ४ दिवस पावसाची शक्यता

Khandesh Rainfall : पावसाची पाठच; ‘हतनूर’मधून विसर्ग घटला

Nashik DCC Bank : जिल्हा बँकेची सामोपचार कर्ज परतफेड योजना लागू

Floriculture Management: सणासुदीसाठी झेंडू, शेवंती, निशिगंध फुलांचे नियोजन कसे करावे? उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचा सल्ला

PM Kisan Yojana : दुहेरी नोंदणीमुळे पीएम किसानचा लाभ मिळेना

SCROLL FOR NEXT