Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

पावसाच्या खंडामुळे पिकांना ताण

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत १४ ते १५ दिवसांपासून पावसाचा खंड (ड्राय स्पेल) पडला आहे. परिणामी वाढीच्या, फुलोरा तसेच परिपक्वतेच्या अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत १४ ते १५ दिवसांपासून पावसाचा खंड (Lac Of Rain) (ड्राय स्पेल) पडला आहे. परिणामी वाढीच्या, फुलोरा तसेच परिपक्वतेच्या अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण (Crop On Stressed) बसला आहे. उन्हामुळे (Heat) हलक्या जमिनीवरील पिके सुकू (Crop Damage) लागली आहेत. अनेक शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. पावसाचा खंडकाळ लांबला, तर उत्पादनावर (Crop Production_ परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदाच्या पावसाळ्यात आजवर अपेक्षित सरासरी पावसापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परंतु ऑगस्ट पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात मागील दोन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आंतरमशागतीची कामे करता आली. तणनियंत्रणामुळे पीक परिस्थितीत सुधारणा झाली आहे. सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीनचे पीक फुलोरा, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. कपाशी पाते, फुले, बोंडे भरण्याच्या अवस्थेत आहे. तूर, ज्वारी, बाजरी, हळद आदी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मूग, उडीद शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत.

काही भागांत लवकर पेरणी केलेल्या मुगाची तोडणी सुरू आहे. अनेक भागांत सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे जमिनी चिभडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. गेल्या पंधरा दिवसांपासून भरपूर सूर्यप्रकाश मिळत असल्यामुळे पिके बहरली आहेत. परंतु ऊन, वारे यामुळे मातीचा वरचा थरातील ओलावा कमी झाला आहे. जमिनीला भेगा पडल्या आहेत. बरड, हलक्या, माळरान जमिनीवरील पिके उन्हात सुकू लागली आहेत.

सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पिकांना पाणी देत आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, जिंतूर तालुके, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यांतील डोंगर भागातील खडकाळ हलक्या जमिनीवरील पिकांना पावसाच्या उघडिपीचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत. इतर भागांतही कोरडवाहू जमिनीवरील पिकांसाठी लवकर पाऊस पडणे आवश्यक आहे. अन्यथा उत्पादकतेत घट येऊ शकते.

आधी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे आमच्या डोंगरी भागातील हलक्या माथ्यावरीलसोयाबीन, हळदीला ताण बसलाआहे. पावसाचा खंड वाढला तर उत्पादनात घट येईल.
अतुल राऊत, साखरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT