Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वादळी पावसाने पिके आडवी

गेल्या महिनाभरापासून खंड पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली होती. त्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

टीम ॲग्रोवन

अंकुशनगर, जि. जालना : अंकुशनगर परिसरात शनिवारी (ता. ३) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार (Heavy Rainfall With Wind) झालेल्या पावसामुळे परिसरातील कपाशी (Cotton), ऊस, बाजरी, कडूळ आडवे तर फळबागांमध्ये फळ गळ (Fruit Fall) मोठ्या प्रमाणात झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान (Crop Damage) झाले.

गेल्या महिनाभरापासून खंड पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली होती. त्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी पोल पडले ,पत्रे उडून गेली, झाडे पडली, विद्युत तारेवर झाडे पडल्याने अनेक ठिकाणची वीज गुल झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे ऊस कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे पिकांचे होत्याचे नव्हेत झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

वडीगोद्रीसह पंचक्रोशीत पाऊस

वडीगोद्री : वडीगोद्रीसह अंतरवाली सराटी, धाकलगाव, पीठोरी सिरसगाव ( ता.अंबड) आदी ठिकाणी शनिवारी (ता.३) रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. शनिवार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या मध्ये पिकांना जीवदान मिळाले परंतु शेतातील ऊस, कापूस, आदी पिकांचे नुकसान झाले. ही पीक जमिनीवर आडवी झाली. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभ्या पिकांची दाणादाण झाली. शासनाने त्वरित पडलेल्या पिकांचे पंचनामे करावी असी मागणी शेतकरी बाबा दखणे यांनी तहसीलदार अंबड यांना केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT