Agriculture Drone Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Drone : येसगाव येथे ड्रोनद्वारे पीक फवारणी पाहणी कार्यक्रम

खुलताबाद तालुक्यातील येसगाव नं. ३ येथील प्रगतिशील शेतकरी नितीन रोहिदास खंडागळे यांच्या शेतातील मका व अद्रक पिकामध्ये ड्रोनद्वारे पीक फवारणी पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील येसगाव नं. ३ येथील प्रगतिशील शेतकरी नितीन रोहिदास खंडागळे यांच्या शेतातील मका (Maize) व अद्रक पिकामध्ये ड्रोनद्वारे पीक फवारणी (Drone Spraying) पाहणी कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमास औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख एस. बी. पवार आणि कृषी विज्ञान केंद्र, गांधेली येथील कीटकशास्त्र विषय तज्ञ तुषार चव्हाण मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

एस.बी.पवार यांनी शेतीमधील कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्याच्या उपाययोजनांची चर्चा केली. तुषार चव्हाण यांनी शेतीमधील नवतंत्रज्ञानाची निकड व उपलब्ध साधनांचा वापर या विषयावर बोलताना बायरच्या सहकार्याने होत असलेल्या ड्रोन वापराचे फायदे नमूद केले.

शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सध्या शेती व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही दिवसांपासून ड्रोन च्या साहाय्याने शेती फवारणीचा पर्याय समोर येत आहे. अत्याधुनिक शेती पद्धतीने शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साहाय्याने शेतात कीटकनाशकांची फवारणी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये बचत होत आहे. ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक तसेच घ्यावयाची काळजी याबद्दल संतोष पापळ यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पांडव यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विकास शेरकर, मोहन गायकवाड, कृष्णा सोनवणे यांनी केले. यावेळी सरपंच अरुण खंडागळे, नितीन खंडागळे, अशोक खंडागळे, आबासाहेब खंडागळे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT