Crop Harvesting Agrowon
ताज्या बातम्या

Crop Harvesting : काढणीला आलेल्या पिकांची वाताहत

औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत दाणादाण; जालन्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांत काढणीला आलेल्या पिकांची वाहतात (Crop Damage) करणे सुरू केले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी मंगळवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील दोन मंडलांत अतिवृष्टी (Heavy Rainfall) झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ५२ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. काही मंडलांत मध्यम हजेरी लावणारा पाऊस बहुतांश मंडलात तुरळक स्वरूपाचा बरसला. खुलताबाद तालुक्याकडे पावसाने पाठ फिरविली. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी १५ मंडलांकडे

पाठ फिरवणारा पाऊस ३४ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार स्वरूपात बरसला. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी व सुखापुरी या दोन मंडलात अतिवृष्टी झाली. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २३ मंडलाकडे पावसाने पाठ फिरवली.

तर ४० मंडलांत पावसाची हजेरी तुरळक, हलकी, मध्यम स्वरूपाची राहिली. जिल्ह्यातील परळी, धारूर तालुक्याकडे पावसाने पूर्णतः पाठ फिरवली. लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४४ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील १६ मंडलांत पावसाचा टिपूसही बरसला नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी ३६ मंडलांत तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या या पावसाने फुटलेल्या कापसाच्या वाती करणे सुरू केले आहे. कपाशी पिकात बोंड्सडचा प्रादुर्भावही वाढला आहे. दुसरीकडे काढणीला आलेल्या सोयाबीनची ही पावसामुळे माती होण्याची चिन्ह आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahrashtra Summer Weather: उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचा इशारा

Agricultrure Funding: मंजुरीपेक्षा जास्त निधी देत केंद्राचा सुखद धक्का

Sugar Industry: साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ice Apple Demand: उन्हामुळे ताडगोळ्यांना मोठी मागणी

Beetroot Farming: वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

SCROLL FOR NEXT