Farmer Loan Waiver Implementation Issues: राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान काही व्यापारी बँकांकडून गंभीर त्रुटी व हेराफेरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या बँकांनी कर्जदार शेतकऱ्यांच्या व्याज आकारणीत अवाच्या सवा वाढ करून नाव, बँक खात्याचा तपशील आणि कर्ज प्रकरणात मोठी तफावत दाखविल्याचे उघडकीस आले आहे..या अनियमिततेमुळे सहकार विभागाने सुमारे पाच ते साडेपाच लाख शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकांना त्रुटीनिशी परत पाठवली असून, या सर्व खात्यांचे विशेष ऑडिट (लेखापरीक्षण) करण्याचा निर्णय घेतला आहे..Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीत ३.५५ लाख शेतकरी.राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली असून, आतापर्यंत विविध टप्प्यांत लाभार्थींच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात आला आहे. मात्र, पुढील टप्प्यातील सुमारे पाच ते साडेपाच लाख लाभार्थ्यांच्या यादीत मुख्यतः व्यापारी बँकांशी संबंधित शेतकरी आहेत..या बँकांनी सादर केलेल्या ‘डेटा’ची सहकार खात्याकडील उपलब्ध आकडेवारीशी तुलना केली असता, शेतकऱ्यांची प्रत्यक्ष थकबाकी आणि बँकांनी दाखवलेली थकबाकी यामध्ये मोठा फरक आढळून आला आहे. या बँकांनी आपला ‘हेअरकट’ (सवलत) वाचविण्यासाठी आणि सरकारकडून अतिरिक्त निधी पदरात पाडून घेण्यासाठी चुकीच्या पद्धतीने जादा व्याजाची आकारणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे..Loan Waiver List: दुसऱ्या टप्प्यात ३,८०८ शेतकरी पात्र.या बँकांमध्ये कोअर बँकिंग प्रणाली लागू असून, रिझर्व्ह बँकेचे नियमित ऑडिटही होत असताना अशा प्रकारची ‘अजब चूक’ घडल्याने सहकार खात्याची डोकेदुखी वाढली आहे. बँकांनी दिलेल्या याद्यांमध्ये खातेदारांच्या नावात बदल आणि माहितीमधील त्रुटी यांसारख्या अनेक अडचणी समोर आल्या आहेत..या संपूर्ण घोळामुळे कर्जमाफीच्या पुढील यादी प्रसिद्ध होण्यास व पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास विलंब होत आहे. शासनाला या चुकीच्या व्याज आकारणीचा कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागू नये, यासाठी सहकार विभागाचे सरकारी लेखापरीक्षक प्रत्येक खात्याची सखोल तपासणी करणार आहेत..शेतकरी कर्जमाफी योजनेत व्यापारी बँकांकडून जवळपास पाच ते साडेपाच लाख शेतकऱ्यांची यादी सहकार खात्याला प्राप्त झाली होती. मात्र, या चार ते पाच बँकांच्या यादीतील बहुतांश खातेदार शेतकऱ्यांच्या हिशेबांमध्ये मोठी तफावत आहे. मोठ्या प्रमाणात व्याजाची आकारणी झाल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत, तसेच अनेक छोट्या-मोठ्या त्रुटी असल्याने ही सर्व यादी संबंधित बँकांना परत पाठविण्यात आली आहे. सहकार खात्यामार्फत या यादीचे ऑडिट केले जाणार आहे.दीपक तावरे, आयुक्त, सहकार विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.