Heavy Rain
Heavy Rain Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

टीम ॲग्रोवन 

नगर : नेवासा तालुक्यातील (Nevasa District) आठही महसूल मंडलांत सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान (Kharip Crop Damage) झाले आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी केली आहे.

माजी मंत्री गडाख यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नेवासा तालुक्यातील गोधेगाव, बहिरवाडी, धामोरी, प्रवरासंगम, सुरेगाव गंगा,

भालगाव, खालसा, बोरगाव, जळके खु, जळके बु, वरखेड, शिरसगाव, पाचेगाव, घोगरगाव, मंगळापूर, खेडलेकाजळी या गावांसह नेवासा तालुक्यातील आठही महसूल मंडलांत जोरदार पाऊस होऊन पिके पाण्याखाली गेली आहेत.

कपाशी, तूर, सोयाबीन, कांदा, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी जमिनीतील माती वाहून गेली आहे. जागोजागी जमीन शेवाळली आहे तसेच अनेक ठिकाणी मातीही वाहून गेली आहे. विम्याचा लाभ मिळण्यासाठी २४ तासांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तरच अतिवृष्टी हा नियम आहे.

या नियमांसह पिकांचे फोटो अपलोड करणे, टोल फ्री नंबरवर तक्रार करणे यासह इतर जाचक अटी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीच्या आहेत. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी विलास नलगे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, बाळासाहेब शिंदे, दिगंबर नांदे, दत्तात्रय तुवर, काकासाहेब गायके आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : वाढत्या उन्हाने वाढली होरपळ; देशातील अनेक ठिकाणी पुढील ५ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

Loksabha Election : ‘आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्या’

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

SCROLL FOR NEXT