Crop Damage Survey Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Survey : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतंची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Team Agrowon

Unseasonal Rain छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी (Crop Damage Survey)आज जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांनी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जे कर्मचारी संपावर आहेत त्यांच्या जागेवर पर्यायी कर्मचारी देऊन पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील काही भागांत ६, ७, १६ आणि १७ मार्च रोजी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मोसंबी, डाळिंब, तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी या भागाचा दौरा केला.

त्यांनी शेकट्या जवळील वाहेगाव देमणी या भागात बळवंत तांगडे या बळीराजाच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली.

या वेळी उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर रोडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तहसीलदार ज्योती पवार, अपर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT