Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वादळी पाऊस, गारपिटीने शेकडो हेक्टरवर नुकसान; मदत कधी मिळणार?

वऱ्हाडात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अकोला, वाशीम जिल्ह्यांत काही तालुक्यांत वादळी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहेत.

Team Agrowon

Akola News ः वऱ्हाडात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास अकोला, वाशीम जिल्ह्यांत काही तालुक्यांत वादळी वारा, पाऊस व गारपीट (Hailstorm) झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहेत.

कृषी विभागाने (Agriculture Department) दिलेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात पातूर, बार्शीटाकळी, तर वाशीम जिल्ह्यात मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात गहू, हरभरा, संत्रा, कलिंगड, पपई, आंबा, कांदा, लिंबू, ज्वारी, भुईमूग, मोसंबी अशा विविध पिकांना याचा फटका बसला.

अकोला जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे पातूर तालुक्यात २८७ शेतकऱ्यांचे ३७४ हेक्टरवर नुकसान झाले आहे. या तालुक्यात प्रामुख्याने कोठारी खुर्द, कोठारी बुद्रुक, आस्टुल, पास्टूल गावांत पावसासह गारपीट झाली.

कोठारी खुर्द गावात ८२ हेक्टर, कोठारी बुद्रुक गावात ८५ हेक्टर, आस्टुलमध्ये १०५, पास्टूलमध्ये १०२ हेक्टरवर नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यात १५४ हेक्टरवर नुकसानाची नोंद झाली.

जिल्ह्यात पातूर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. पांगराबंदी व इतर गावांत जोरदार गारपीट झाल्याचे वृत्त आहे.

कृषी खात्याने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार मालेगाव तालुक्यात २५६ हेक्टरवरील गहू, मोहरी, तीळ, ज्वारी, कांदा, कलिंगड, भाजीपाला, लिंबूवर्गीय पिकांचे नुकसान झाले. मंगरूळपीर तालुक्यातही ५७ हेक्टरवरील गहू, कांदा, हरभरा, भाजीपाल्याचे नुकसान झाले. हा प्राथमिक अहवाल असून, प्रत्यक्षात नुकसान वाढण्याची शक्यता आहे.

किन्हीराजा परिसरात पाऊस...

वाशीम जिल्ह्यातील रामराववाडी, पिंपळशेंडा परिसरांत गारांसह पाऊस झाल्याने गहू, हरभरा, लिंबू, आंबा, कांदा, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. लिंबाच्या आकाराची गार पडल्याचे वृत्त आहे.

किन्हीराजासह पिंपळशेंडा रामराववाडी, कुत्तरडोह, माळेगाव, अमानवाडी परिसरांत शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या भागात गारपीट व वादळी पावसाने नुकसान झाल्याने त्वरित सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वीज पडून तूर जळाली...

वाशीम जिल्ह्यात मानोना तालुक्यातील पाळोदी गावात तुरीच्या गंजीवर वीज पडली. यामुळे सुमारे एक लाख २२ हजार रुपयांची तूर जळून खाक झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT