Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वादळी पावसामुळे संत्रापट्टयात नुकसान

मोर्शी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये वादळी पाऊस, गारपिटीमुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Crop Damage Amravati News ‘‘मोर्शी तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये वादळी पाऊस, गारपिटीमुळे (Hailstorm) संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान (Orange Crop Damage) झाले आहे. त्याची दखल घेत नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी,’’ अशी मागणी मथुराबाई ठाकरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश ठाकरे यांनी केली.

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना याबाबत निवेदन पाठविण्यात आले. निवेदनानुसार, गेल्या पंधरा दिवसांपासून संत्रा लागवड आणि उत्पादनात आघाडीवर असलेल्या मोर्शी परिसरात पाऊस सुरू आहे.

पावसाच्या जोडीला वादळी वारा आणि गारपीटही झाली. त्यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. सालबर्डी, डोंगरयावली, हिवरखेड ही गावे सर्वाधिक प्रभावित आहेत. गहू, कांदा, भाजीपाला उत्पादकांनाही याचा फटका बसला. काढणीला आलेली पिके सर्वाधिक बाधित झाली आहेत. या नुकसानीचे सर्वेक्षण, पंचनामे तत्काळ करून भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

‘नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेशच नाहीत’

चांदूरबाजार तालुक्यातील मयूर देशमुख यांचा दोन एकर गहू होता. वादळी पावसामुळे गव्हाचे नुकसान झाले. तीन एकरांवरील कांदाही सडल्याने त्यांना नुकसान सोसावे लागले आहे. कृषी विभागाकडून मात्र त्यांना सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी, या नुकसानीची मदत मिळणार की नाही, असा प्रश्‍न देशमुख यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT