Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : अवकाळीमुळे होणारे नुकसान थांबता थांबेना

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत वादळी पाऊस झाला.

Team Agrowon

Parbhani News परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत शुक्रवारी (ता. ५) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत वादळी पाऊस झाला. या दोन जिल्ह्यांत मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस थांबत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे उन्हाळी पिके, फळे, भाजीपाल्याचे नुकसान (Crop Damage) सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे.

वादळी वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्या आहेत. अनेक गावांचा, कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. शेडनेटगृह, पॉलिहाउसचे नुकसान झाले आहे. घरे तसेच आखाड्यावरील निवाऱ्याचे पत्रे उडून गेले आहेत.

परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. परभणीसह जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १०.१ मिमी पाऊस झाला. सर्वाधिक २९.५ मिमी पाऊस आडगाव बाजार मंडलात झाला.

गेल्या आठवड्यात गारपीट झाली. गुरुवारी रात्री वादळी पावसाने, गारपिटीने दोडका पिकाचा मांडव कोसळल्याने वेल तुटले. ज्वारीचा कडबा, दाणे काळे पडले. हळद पाण्यात भिजत आहे. शेडनेटचे नुकसान झाले. संत्रा ताणावर असताना अवकाळी पावसामुळे मृग बहरासाठी अडथळा निर्माण झाला आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी.

- विष्णू निर्वळ, रूढी, ता. मानवत, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT