Unseasonal Rain Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rain : पाऊस मराठवाड्याची पाठ सोडता सोडेना

पाऊस मराठवाड्याची पाठ सोडताना दिसत नाही आहे. अंदाजाप्रमाणे पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. २८) दुपारी अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

Team Agrowon

Unseasonal Rain छत्रपती संभाजीनगर : पाऊस मराठवाड्याची पाठ सोडताना दिसत नाही आहे. अंदाजाप्रमाणे पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. २८) दुपारी अनेक भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याचा फटका आंबा, मोसंबीसह उन्हाळी, रब्बीतील काढलेल्या पिकांना (Crop Damage) बसला आहे.

मराठवाड्यात पावसाचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अनेक भागांत हजेरी लावणारा वादळी पाऊस शुक्रवारी दुपारपर्यंत देखील अनेक भागांत सुरूच होता.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चापानेर, टाकळी, राजेराय, पाचोड, लिंबे, जळगाव, गवळीशिवरा, महालगाव, शिवूर, गंगापूर, कायगाव यांसह सोयगाव तालुक्यातील तिडका, जरंडी आदी गाव शिवारांतही पावसाची वादळासह हजेरी कायम होती.

जालना जिल्ह्यातील अंकुश नगर, वडीगोद्री, गोंदी, पाथरवाला बुद्रुक, अंबड, शहागड आदी ठिकाणी वादळासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील रामनगर व विरेगाव परिसरात गुरुवारी रात्री गारपीट झाली.

धाराशिव जिल्ह्यातील तुरोरी परिसरात गुरुवारी सायंकाळपासून अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. शुक्रवारी पहाटे व सकाळी पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील तांदुळजा मदनसुरी उजनी औराद शहाजानी गाव शिवारात वादळी पाऊस हजेरी लावली.

शेतीला तळ्याचे स्वरूप

जिल्ह्यातील औराद शहाजानी व परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तगरखेडा येथील शेतकरी राजाप्प व्यंकटराव कल्याणी (वय ५०) यांचा गुरुवारी वीज पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी २४ तासांपर्यंत औराद शहाजनी येथील जलविज्ञान प्रकल्पात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाचा जोर जास्त असल्यामुळे लातूर-जहीराबाद महामार्गावरील जामखंडी येथे पूर आला. त्यात रस्ता वाहून गेला. पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली. पाऊस खूप जोरदार असल्यामुळे शेतीला तळ्याचे स्वरूप आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT