Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : निम्न दुधनाच्या कालव्याच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान

निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याच्या अपूर्ण वितरिका, चाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत.त्यामुळे पाणी वाहून जात आहे.

Team Agrowon

परभणी ः निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याच्या अपूर्ण वितरिका, चाऱ्यांची कामे अपूर्ण आहेत.त्यामुळे पाणी वाहून जात आहे. कोथाळा (ता. मानवत) येथील शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी साचल्यामुळे गहू, हरभरा पिकांचे (Crop) नुकसान (Crop Damage) झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे नुकसान झाल्याची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निम्न दुधना प्रकल्पाच्या धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्याच्या वितरण प्रणाली अंतर्गत वितरिकांची शेत कामे अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी खोदकामे झाली आहेत. परंतु अस्तरीकरण बाकी आहे. या काल्याव्दारे रब्बी हंगामातील सिंचन आवर्तन सुरु आहे. शेतकरी सिंचनासाठी पाणी वापरत आहेत.

परंतु अर्धवट कामांमुळे पाण्याची नासाडी होत आहे. कालव्याव्दारे पाणीवापराचे व्यवस्थापन करण्यासाठी कर्मचारी नाहीत. अतिरिक्त पाणी ओढे नाल्यांपर्यंत पोचविण्यासाठी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे वाहून जाणारे पाणी शेतांमधून वाहत आहे.

त्यामुळे जमिनी खरडून जात आहेत. नुकत्याच पेरणी केलेल्या तसेच उभ्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कालव्याच्या पाणी वापराचे व्यवस्थापन करावे. पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निम्न दुधना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT