Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : जोरदार पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान

काही ठिकाणी अतिवृष्टी; वीज पडून तरुणीचा मृत्यू

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्ह्यात पावसाने गुरुवारी (ता.२९ ) सकाळी चांगलाच धुमाकूळ घातला.(Heavy Rainfall) गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत, शिरूर, दौंड, भोर, बारामती, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे शेतात व रस्त्यावर पाणीच पाणी साचले. पिकांचेही मोठे नुकसान (Crop Damage)झाले आहे.

शिरूर तालुक्यातील तळेगाव येथे सर्वाधिक ५६ मिलिमीटर पाऊस पडला. तर सणसवाडी, शिक्रापूर, बेट, बजरंगवाडी, मलठण फाटा, कोंढापुरी, तळेगाव ढमढेरे भागांत बुधवारी (ता. २८) दुपारनंतर तब्बल दीड तास धो-धो पाऊस पडला. त्यामुळे नगर महामार्गावरील अनेक गावांत ओढ्यांना पूर आला. त्यामुळे रस्तेही बंद झाले. तर एका युवकांची दुचाकी या पाण्यात वाहून गेली.

सादलगाव (ता. शिरूर) येथे बुधवारी दुपारी वीज पडून १६ वर्षीय ऊसतोडणी मजूर तरुणीचा मृत्यू झाला. रिता सीताराम नाईक (मूळ रा. आडशी, जि. नंदूरबार) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर या तरुणीची विवाहित बहीण गीता राजेश वळवी ही या घटनेत जखमी झाली आहे.

तिच्यावर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दौंडमधील बोरीबेल, जुन्नरमधील खोडद या भागांतही तुफान पाऊस झाला. त्यामुळे टोमॅटो, मिरची, चवळी, फ्लॉवर व इतर भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

ऊस लागवडीखालील जमिनी पावसाच्या पाण्याने उफळल्याने उसाचे नुकसान झाले. पिकांच्या नुकसानीबरोबर जमिनीची धूप रोखण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस (मि.मी) :

मुळशी - मुठे २,

भोर - भोर ६, भोलावडे ७, नसरापूर ८, किकवी २०, संगमनेर ९

वेल्हा - वेल्हा ८, विंझर ६, आंबवणे ४

जुन्नर - नारायणगाव १, वडगाव आनंद १५, निमगाव सावा ७, बेल्हा १८

खेड - वाडा ४, राजगुरूनगर २, कुडे ५, पाईट ६, आळंदी ८, कडूस १

आंबेगाव - घोडेगाव ३, आंबेगाव २, कळंब २४, पारगाव २, मंचर १०

शिरूर - वडगाव १४, मलठण १६, रांजणगाव १२, कोरेगाव ३८, पाबळ १९, शिरूर ५

बारामती - वडगाव २८, मोरगाव ४, उंडवडी ५

इंदापूर - इंदापूर १०

दौंड - देऊळगाव २३, पाटस ३५, यवत २, दौंड ५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT