Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Crop Damage : विदर्भात गारपिटीचा पिकांना मोठा फटका

गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nagpur News गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने (Hailstorm) विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. वीज कोसळून जीवितहानी होण्यासह साठवून ठेवलेल्या कापसाचे नुकसान झाले.

वीज कोसळून नागपूरच्या मौदा तालुक्यात वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. हिंगणा तालुक्यात शेतातील गोठ्यावर वीज कोसळली आणि गोठ्यात साठवून ठेवलेल्या कापसाने पेट घेतला. यात ४५ क्विंटल कापसाची राख झाली.

अंकुश बागडे या शेतकऱ्याचे चार लाख ३२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. उमरी (वाघ) शिवारात शनिवारी (ता. ८) ही घटना घडली. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी सरपंच निकिता बागडे, माजी सरपंच नरेंद्र वाघ यांच्यासह नागरिकांनी केली.

अवकाळी पावसाने सावनेर तालुक्यातील पिंपळा (डागबंगला) परिसरात कापणी केलेल्या गव्हाचे नुकसान झाले.

भाजीपाल्यासह कांद्याच्या पिकाला फटका बसला. शिवाय इसापूर येथील शांताबाई मेश्राम यांच्या घराचे घराचे छत कोसळले.

मौदा तालुक्यातही नुकसान झाले. वीरसी येथे शेतात वीज कोसळून शेतकरी आनंदकिशोर गोविंदराव धोटे (वय ४१) यांचा मृत्यू झाला. या घटनेत झुंबल खंगार, लोकेश मते, विष्णू बरबटे व जितेंद्र कोरचे हे जखमी झाले.

नागपूर विभागात पिकांचे नुकसान झाले असले तरी महावीर जयंती, गुड फ्रायडे व शनिवार, रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे या भागात नुकसान सर्वेक्षण प्रभावित झाले. परिणामी नुकसानीचा एकूण आकडा मिळू शकला नाही. अमरावती विभागात देखील अशी स्थिती होती.

अमरावती जिल्ह्यात ५२२ हेक्‍टर पिके मातीमोल

दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शुक्रवार (ता.७) आणि शनिवार (ता. ८) असे सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने ५२२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. प्रशासनाने प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT