Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : आंबे गळाले; हळद भिजली, बाजरी-मका आडवी

परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत रविवारी (ता.३०) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे आंब्यांची फळगळ झाली.

Team Agrowon

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२ मंडलांत रविवारी (ता.३०) मध्यम ते जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे आंब्यांची फळगळ झाली. झाडे उपटून पडली. शेतात वाळवत घातलेली हळद भिजली.

उन्हाळी बाजरी, मका पिकांचे नुकसान झाले. गेल्या आठवड्यापासून या दोन जिल्ह्यांत वादळी पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.

परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता.२९) दुपारनंतर अनेक तालुक्यात पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील ५२ मंडलांत जोरदार पाऊस झाला.

शिजवून शेतात वाळवत घातलेली हळद झाकून ठेवताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यात ताडपत्र्या उडून गेल्यामुळे हळद भिजली.

आंब्यांची फळगळ झाली. झाडे मोडून पडली. जोरदार पावसामुळे मोकळ्या शेतामध्ये पाणी साचून राहिले, असे मजलापूर (ता. पूर्णा) येथील शेतकरी बालासाहेब हिंगे यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील ३० मंडलांत जोरदार पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळी पाने फाटली. झाडे मोडून पडली. हळदीसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळी तालुक्यांची ‘ग्राउंड ट्रुथिंग’; प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे कृषी आयुक्तांचे आदेश

Spice Sale Ban: सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Sugar Stock Sale: ऑक्टोबरमधील साखर नोव्हेंबरमध्येही विकता येणार; केंद्र सरकारची कारखान्यांना परवानगी

Maharashtra Weather: कोकणात उष्ण हवामान शक्य

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

SCROLL FOR NEXT