Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : गुजरातमध्ये नुकसानभरपाई, महाराष्ट्रात मात्र चालढकल

देशात अनेक राज्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. १ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये पावसामुळे शेतीला फटका बसला. महाराष्ट्रात शेतीचे होणारे नुकसान जास्त आहे.

Mahesh Gaikwad

पुणेः गुजरात सरकारने पावसामुळे नुकसान (Heavy Rain Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) जाहीर केली. गुजरात सरकारने ६३० कोटी ३४ लाख रुपये नुकसानभरपाई देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नुकसानग्रस्तांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र महाराष्ट्रात अद्यापही चालढकल सुरु असल्याचा आरोप होत आहे.

देशात अनेक राज्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. १ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये पावसामुळे शेतीला फटका बसला. महाराष्ट्रात शेतीचे होणारे नुकसान जास्त आहे. त्यामुळे शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. मात्र सरकारी पातळीवर अद्यापही चालढकल सुरु आहे. पण शेजारच्या गुजरातने पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली.

गुजारतमधील जवळपास ११ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांंना पावसाचा फटका बसला. यात मुख्यतः सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरामध्ये कापूस, कडधान्य पिके, सोयाबीन, भुईमूग, भरडधान्य पिकांचे नुकसान झाले. सरकारने केलेल्या सर्वेक्षणात उदेपूर, नर्मदा, पंचमहल, नवसारी, वलसाड, डांग, तापी, सूरत, कच्छ, जुनागड, मोरबी, पोरबंदर, आणंद आणि खेडा या जिल्ह्यांतील ५० तालुके बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. तर २ हजार ५५४ गावांना फटका बसला. पाऊस उघडल्यानंतर सरकारने पहिल्या पाच दिवसांमध्ये नुकसानीचे सर्वेक्षण केले आणि लगेच नुकसानभरपाई जाहीर केली.

गुजरातमधील ८ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ६३० कोटी ३४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना ९ लाख १२ हजार हेक्टरसाठी ही नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारच्या पोर्टलवर नोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले.

गुजरात सरकारने शेतकऱ्यांना लगेच नुकसानभरपाई जाहीर केली. तसेच पुढील काही दिवासांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. हा पैसा शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीसाठी वापरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे गुजरात सरकारने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT