Cow Milk Price agrowon
ताज्या बातम्या

Cow Milk Price : गोकुळ, चितळेसह ८ संघांनी गाय दूध खरेदी दरात केली कपात

Cow Milk Rate : गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २ रुपये कपात केली आहे. त्‍यामुळे गाय दूध खरेदी आता ३७ रुपयांवरून ३५ रुपये केली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Milk Production : महाराष्ट्रात गायीच्या दूध दरावरून गोंधळ सुरू आहे. अशातच राज्यातील दूध संघांनी गायीच्या खरेदी दूध दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समितीची स्थापना केली.

या समितीकडून गायीच्या आणि म्हशीच्या दुधाला दिला जाणारा किमान दूध दर पूढच्या तीन महिन्यात घेण्याची जबाबदारी दिली आहे. परंतु यावर तोडगा निघण्यापूर्वी गायीच्या खरेदी दरात कपात करण्यात आली आहे.

दूध पावडर, बटर, लोण्याचे दर कमी झाल्यामुळे आजपासून (ता. १) गाय दूध खरेदी दरात २ रुपयांची कपात करण्याचा निर्णय गोकुळ, वारणा, चितळे, भारत डेअरी, राजारामबापू, कोयना, हुतात्मा संघ, थोटे यांनी घेतला आहे. गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २ रुपये कपात केली आहे. त्‍यामुळे गाय दूध खरेदी आता ३७ रुपयांवरून ३५ रुपये केली आहे.

दरम्यान, गोकुळकडून खरेदी दरात कपात केल्यानंतर सोमवारपासून (ता. ३) प्रतिलिटर गाय दूध विक्री दरातही २ रुपयांची कपात केली असल्याची माहिती देण्यात आली. भारत डेअरी येथे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सहकारी, खासगी दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघटनेची बैठक झाली.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये खासगी दूध संघांचे गाय दुधाचे दर ३२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. बाजारपेठेत सध्या दूध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. याचा विचार करून गाय दूध दरात प्रतिलिटर २ रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोकुळ, वारणा, चितळे, भारत डेअरी, राजारामबापू , कोयना संघ, हुतात्मा संघ, थोटे डेअरी व इतर संघांनी याबाबत आपली विस्तृत भूमिका मांडल्यानंतर गाय दुधाचे खरेदी दर प्रतिलिटर २ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Mapping: गावाचे मॅपिंग नसल्याने शेतकऱ्यांची वाढली चिंता

Nanded Unseasonal Rain: नांदेडला अवकाळीचा केवळ हदगावला फटका

Reservoir Levels Drop: पाणीसाठ्यामध्ये तीन टक्क्यांची घट

Sangli Water Crisis: सांगलीत सिंचन योजनांसह पिण्याच्या पाण्यात कपात

Baloon Dam Issue: वाळूसाठी गिरणेवरील बलून बंधारे दुर्लक्षित

SCROLL FOR NEXT