Cotton Nutrient Management Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Sowing : खानदेशात कापूस लागवड किंचित घटणार

Cotton Market Update : खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. पण यंदा जूनमध्ये पाऊस न आल्याने लागवड किंचित घटण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. पण यंदा जूनमध्ये पाऊस न आल्याने लागवड किंचित घटण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला यंदा लागवड स्थिर राहण्याचा अंदाज होता. पण पाऊसमान हव्या त्या वेळेस चांगले नसल्याने लागवडीबाबत अंदाच बदलले आहेत.

सुमारे नऊ लाख हेक्टरवर खानदेशात लागवड होईल, अशी अपेक्षा होती. खानदेशात एकूण १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिकांची पेरणी केली जाते. यात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली. सुमारे सव्वा लाख हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस आहे.

यंदा पूर्वहंगामी कापूस लागवड बऱ्यापैकी किंवा गेल्या वर्षीच्या तुलनेत फारशी वाढलेली नाही. कापसाचा हमीभाव ७०२० रुपये प्रतिक्विंटल, असा लांब धाग्यासाठी आहे. तसेच कापूस दर गेले दोन वर्षे सरासरी सात हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाले. शासनाने मागील वेळेस खरेदी केली नाही. यंदाही खरेदी करील की नाही, याची शंका आहे.

यामुळे कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात २० ते २२ हजार हेक्टरने कमी होऊन पाच लाख ४५ हजार हेक्टरवर जाईल, असा अंदाज आहे. सुरुवातीला लागवड पाच लाख ५५ ते ५५ हजार हेक्टरवर होईल, असा अंदाज होता. परंतु पाऊस जसा लांबला, तशी कोरडवाहू कापूस लागवड रखडली.

अनेक शेतकरी १० जुलैनंतर कापूस लागवड टाळतात. कारण उशिराच्या लागवडीत रोगराई अधिक येते. कापूस लागवडीची मुदत अद्याप आहे. कापसाला पर्यायी पीक नाही.

परंतु गुलाबी बोंड अळीचा डिसेंबरमध्ये वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता काही शेतकरी मागील हंगामापासून कापूस लागवड टाळत आहेत.

जिल्ह्यातील लागवड ५ लाख ४५ हजार हेक्टरवर होऊ शकते. तर धुळ्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर आणि नंदुरबारात ९२ ते ९३ हजार हेक्टरवर लागवड होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT