Cotton Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Sowing : जळगावात पाच लाख ४१ हजार हेक्टरवर कापूस लागवड

Jalgaon Cotton Sowing : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे खरिपाच्या ९१ टक्के पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के पाऊस झाला आहे. दुसरीकडे खरिपाच्या ९१ टक्के पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत. सर्वाधीक पेरा कापसाचा झाला आहे.

पाच लाख एक हजार ५६८ हेक्टरवर कापसाचा पेरा अपेक्षित होता. तो शेतकऱ्यांनी पाच लाख ४१ हजार ५६५ (१०८ टक्के) हेक्टरवर केला आहे. त्या खालोखाल मक्याचा ७४ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.

जिल्ह्यात २६ जूनपर्यंत पावसाचे आगमन झाले नव्हते. मात्र, ६ जुलैसून शहरासह जिल्ह्यात चांगल्या पावसाने हजेरी लावली. यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना चांगलाच वेग आला. २३ दिवसांत जिरायती कापसासह, ज्वारी, मका, बाजरी, तूर, मूग, उडदाच्या पेरण्या झाल्या. काही शेतकऱ्यांनी उडीद, मुगाचा पेरा करणे टाळले, तर काहींनी पेरणी केली आहे. इतर शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा अधिक केला आहे.

पेरणी स्थिती

पीक हेक्टर टक्के

कापूस ५ लाख ४१ हजार ५६५ १०८ टक्के

मका ७४ हजार ८७८ ७६.४

कापसाला पर्याय नाहीच

मागील हंगामात कापसाला १० ते १३ हजार प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. मात्र, शेतकऱ्यांना साडेसात ते साडेआठ हजारांच्या आतच भाव मिळाला. चांगला दर मिळेल, म्हणून शेतकऱ्यांनी घरात कापूस ठेवला. आता तर सहा हजार रुपयांपर्यंत किमान दर आहेत.

मागील वेळेस रब्बी हंगाम संपला. तरीही कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळाला नाही. कमी दर असतानादेखील जिल्ह्यातील कापूस लागवड सव्वापाच लाख हेक्टरवर पोचली आहे. प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकरी कापसाकडे पाहतात. अर्थात कापसाला जिल्ह्यात पर्यायी पीक शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे यातून दिसते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT