Cotton Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Crop Damage : वादळी पावसामुळे शेतातील कपाशीचे पीक आडवे

मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत अनेक मंडलांत गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक हलका पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्याने कपाशीचे पीक आडवे झाले.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांत अनेक मंडलांत गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक हलका पाऊस (Rainfall) झाला. काही ठिकाणी पावसाबरोबर आलेल्या वादळी वाऱ्याने (Stormy Rain) कपाशीचे पीक आडवे (Cotton Crop Damage) झाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ३९ मंडलांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत तुरळक, हलका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ४१ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. जिल्ह्यातील मंठा तालुक्यात पावसाचा जोर किंचित अधिक होता.

मंठा मंडलात झालेला २६.३ मिमी पाऊस जिल्ह्यात सर्वाधिक राहिला. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २० मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. माजलगाव तालुक्यातील गंगामसला मंडळात ३२.५ मिमी तर गेवराई तालुक्यातील पाचेगाव मंडलात सर्वाधिक ३३.३ मिमी पावसाची नोंद झाली. इतर मंडलांतील पाऊस तुरळक स्वरूपाचाच होता.

लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४३ मंडलांत तुरळक, हलका पाऊस झाला. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ पैकी २१ मंडलांत तुरळक हलक्या पावसाची हजेरी लागली. काढणीला आलेल्या सोयाबीनची व वेचणीला आलेल्या कापसावर कमी अधिक पडणारा पाऊस संकट घेऊन आला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत बहुतांश भागात आकाशात ढगांची गर्दी कायम होती तर ऊन सावलीचा खेळ सुरू होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT