MPKV, Rahuri  Agrowon
ताज्या बातम्या

MPKV, Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठात शुक्रवारी पदवीदान समारंभ

डॉ. चारुदत्त मायी, पद्मश्री, पोपटराव पवार यांना ‘मानद डॉक्टरेट’

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठात (MPKV, Rahuri) शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली ३६ वा पदवीदान समारंभ (Convocation) होणार आहे. या वेळी राज्यपाल कोश्यारी ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

विद्यापीठातील कार्यक्रमाला महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह अधिसभा सदस्य यांची प्रमुख उपस्थिती असेल.

या वेळी नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार

यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी’ देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात होत असलेल्या पदवीदान समारंभ कार्यक्रमात गेल्या वर्षातील विविध विद्या शाखांतील एकूण ६ हजार ८३२ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने

कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्या शाखांतील ६ हजार ३८८ स्नातकांना पदवी, ३८२ स्नातकांना पदव्युत्तर पदवी, तर ६२ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल.

या वेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिकेप्राप्त स्नातक

व आचार्य पदवी स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे, असे कुलगुरू डाॅ. पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT