ताज्या बातम्या

Grain Silos : सोलापूर येथे लवकरच सायलो धान्य कोठाराची उभारणी

भारतीय अन्न महामंडळाच्या अंतर्गत सोलापूर येथील एफसीआय डेपो येथे लवकरच सायलो (एसआयएलओ) धान्य कोठाराची निर्मिती करण्यात येणार आहे.

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः भारतीय अन्न महामंडळाच्या (Food Corporation Of India) अंतर्गत सोलापूर येथील एफसीआय डेपो येथे लवकरच सायलो (Grain Silo) (एसआयएलओ) धान्य कोठाराची निर्मिती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये २५ हजार टन धान्याची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक (Grain Storage) करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय अन्न महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक मनीषा मीना यांनी पत्रकारांना दिली.

केंद्र सरकारच्या भारतीय अन्न महामंडळाचे महाराष्ट्र राज्यात आठ विभागीय कार्यालय असून, या अंतर्गत ९१ धान्य गोदाम असून ज्याची साठवणूक क्षमता ही १९.७५ लाख टन आहे. ज्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीने धान्याची साठवणूक केली जाते. महाराष्ट्रात प्रतिमाह सात करोड पेक्षा जास्त लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचा पुरवठा या माध्यमातून केला जातो.

भारतीय अन्न महामंडळाने आपल्या कार्यप्रणालीमध्ये आधुनिकीकरणावर भर देत राज्यात केंद्र सरकार आणि महामंडळाच्या माध्यमातून १९ ठिकाणी १३.२५ लाख टन सायलो (एसआयएलओ) धान्य कोठाराच्या निर्मितीचा उद्देश ठेवला आहे, अशी माहिती विभागीय व्यवस्थापक मीना यांनी दिली आहे.

या वेळी विभागीय कार्यालय पुण्याचे प्रबंधक गुण नियंत्रण पुनीतकुमार सिंग, सोलापूर डेपो मॅनेजर एस .एन. गायकवाड, सहायक डेपो मॅनेजर अनिल सूर्यवाढ आदींची उपस्थिती होती.

२५ हजार टन साठवणूक क्षमता

भारतीय अन्न महामंडळाच्या मार्फत अन्य जिल्ह्यांप्रमाणे सोलापुरातही सायलो धान्य कोठाराची निर्मिती होणार असून, त्याची क्षमता सुमारे २५ हजार टन धान्य साठवणुकीपर्यंत असणार आहे. या सायलो धान्य कोठारामुळे सोलापुरातील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT