Ayush Prasad agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer Production : घनकचरा व्यवस्थापनातून खतनिर्मिती प्रकल्प गावासाठी फायदेशीर ः आयुष प्रसाद

गावातील कचरा गावातच योग्य ठिकाणी कुजवून घनकचरा व्यवस्थापनातून खतनिर्मिती प्रकल्प गावासाठी फायदेशीर आहे.

Team Agrowon

इंदापूर, जि. पुणे ः गावातील कचरा गावातच योग्य ठिकाणी कुजवून घनकचरा व्यवस्थापनातून (Waste Management) खतनिर्मिती प्रकल्प (Fertilizer Production) गावासाठी फायदेशीर आहे. पहिल्या टप्प्यात इंदापूर तालुक्यातील ५६ गावांमध्ये सदर प्रकल्प सुरू आहेत.

काही गावांतून जागेचा प्रश्‍न वगळता उर्वरित गावांमध्येही प्रकल्प सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. ही समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

इंदापूर येथील पंचायत समिती सभागृहात विविध विभागांच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आयुष प्रसाद बोलत होते.

या वेळी आयोजित आढावा बैठकीत गटविकास अधिकारी विजय परीट, सहायक गट विकास अधिकारी रामचंद्र शिंदे, उपअभियंता बांधकाम विभाग शिवकुमार कुपल, उपअभियंता पाणीपुरवठा विभाग पवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी काळे व अमोल मेरगळ आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक मेहेरकर व पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी प्रसाद पुढे म्हणाले, की इंदापूर तालुक्यात घरकुलाच्या योजनेसाठी २ हजार ५०० लाभार्थी निश्‍चित करण्यात आले आहेत.

घरकुलांचा पहिला हप्ता घेऊनही काम सुरू न करणाऱ्या सुमारे ८०० लाभार्थ्यांकडून लोकअदालतीच्या माध्यमातून नोटिसा देण्यात आल्या आहेत. तो हप्ता परत वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

या वेळी आयुष प्रसाद यांनी इंदापूर तालुक्यातील शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तर जलजीवनमध्ये पुणे जिल्हा अग्रेसर असून जवळपास शंभर टक्के निविदा प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्यात ३५ कामांच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत.

परंतु काही ठेकेदारांनी काम सुरू केलेले नाही. ठेकेदारांच्या वेगवेगळ्या अडचणी असू शकतात. गटविकास अधिकारी व अभियंत्यांनी त्या समजून घ्याव्यात. मात्र ठेकेदारांनी उदासीनता न दाखवता वेळेत व दर्जेदार कामे करण्यासाठी दक्ष राहवे, असे आवाहन केले.

तालुका ‘लम्पी स्कीन’मुक्त

इंदापूर तालुका लम्पी स्कीनमुक्त ठेवण्यासाठी जिल्हा परिषद व इंदापूर तालुका पशुवैद्यकीय विभागाने केलेल्या कामांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कौतुक केले. आगामी काळातही जनावरांचे लसीकरण करून योग्य उपचार करीत तालुका लम्पीमुक्त कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनादेखील त्यांनी केल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT