Ajit Pawar News Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : सहकार, कृषी भवन, साखर संग्रहालय तातडीने पूर्ण करा

Latest Agriculture News : पुण्यातील सहकार भवन, कृषी भवन, साखर संग्रहालय आणि अन्य कामे वेगाने पूर्ण करण्यात येतील. या कामाचा आढावा दर आठवड्याला घेतला जाईल.

Team Agrowon

Mumbai News : पुण्यातील सहकार भवन, कृषी भवन, साखर संग्रहालय आणि अन्य कामे वेगाने पूर्ण करण्यात येतील. या कामाचा आढावा दर आठवड्याला घेतला जाईल. या कामासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वोतपतरी सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. १०) सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध प्रकल्पांबाबत मंत्रालयात गुरुवारी आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्गिका १, २ आणि ३ ची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील. पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली जाईल. पुणे रिंगरोडचे काम आता कुठल्याही कारणामुळे रखडणार नाही.

पुणे येथील कृषीभवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचे चौपदरीकरण, सारथी प्रशिक्षण केंद्र, वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालय, मुंबईतील जीएसटी भवन या कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा या वेळी आढावा घेतला. प्रगतीत अडथळे ठरणारी कारणे दूर करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे राज्यातील विकासप्रकल्पांना गती देण्याबाबत सकारात्मक असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन अमित शाह यांनी दिले आहे.

पुणे मेट्रोची कामे तातडीने मार्गी लावा. पुणे रिंगरोडच्या कामात कुणी अडथळे आणत असेल तर त्याचा मुलाहिजा ठेवू नका. विकासकामात अडथळे ठरत असलेली अतिक्रमणे तत्काळ दूर करा, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागांना केल्या. विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांनी बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PDKV Akola : शिवारफेरीतून अनुभवले फलोत्पादनातील तंत्रज्ञानशिवारफेरीतून अनुभवले फलोत्पादनातील तंत्रज्ञान

Swabhimani Us Parishad : पहिली उचल किती घ्यायची?; गाळप हंगाम सुरू होण्याआधी 'स्वाभिमानी'चा एल्गार, जयसिंगपुरातील ऊस परिषदेत ठरणार आंदोलनाची दिशा

Turmeric Farming : हळद पिकातील प्रमुख किडींचे नियंत्रण

Soil Conservation: आता तरी श्रीमंत करा माती!

National Agri Market: लेखाजोखा राष्ट्रीय बाजाराचा!

SCROLL FOR NEXT