Jalgaon District Milk Producers Union Agrowon
ताज्या बातम्या

Jalgaon District Milk Producers Union : दूध संघाच्या कार्यकारी संचालका विरुद्ध पुन्हा तक्रार

जगदीश बढे यांच्या बिनविरोधसाठी खोटा दाखला देत फसवणूक

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : जिल्‍हा दूध उत्पादक संघाचे (Jalgaon District Milk Producers Union) कार्यकारी संचालक मनोज लिमये (Manoj Limaye) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत नव्याने तक्रार अर्ज दाखल झाला आहे. या तक्रारीत जगदीश बढे यांना बिनविरोध करण्यासाठी खोटा दाखला देऊन फसवणूक केल्याचा आरोप तक्रारदार ठकसेन भास्कर पाटील (रा. चिनावल, ता. रावेर) यांनी केला आहे.

दूध संघाच्या निवडणुकीत खडसे गटाचे जगदीश बढे यांना बिनविरोध करण्यासाठी खोटे दाखले देत आपली फसवणूक केल्याची तक्रार ठकसेन पाटील यांनी पोलिसांत दिल्याने बढे यांच्या बिनविरोध निवडीला न्यायालयात आव्हान दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
चिनावलच्या वसंत सरकारी दूध उत्पादक सोसायटी मर्यादित संस्थेमार्फत तालुका प्रतिनिधी म्हणून उमेदवारी अर्ज जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघासाठी भरला होता. अर्ज भरतेवेळी दूधपुरवठ्याचा दाखला काढला होता. त्यात ३६५ दिवसांचा दूधपुरवठा त्यांनी खालीलप्रमाणे ७ नोव्हेंबरला दिला. त्यानुसार दूधपुरवठा २०१९-२० ८९७५१ लिटर, २०२०-२१ ४८३१ लिटर, २०२१-२२ ४२६३८ लिटरप्रमाणे दिला. ठकसेन पाटील यांनी १० नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. ११ नोव्हेंबरला त्यांना दूधपुरवठा कमी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ठकसेन पाटील यांनी स्थानिक संस्थेत तपास केला असता, दूधपुरवठा २०१९-२० १६१५२९ लिटर, २०२०-२१ ८६९८४ लिटर, २०२१-२२ ८१०६० याप्रमाणे आढळून आला.

योग्य दाखला, पण वेळ गेली
जिल्हा दूध संघात ओरड केल्याने मला योग्य दाखला देण्यात आला. मात्र, तोपर्यंत माझे उमेदवारी अर्ज रद्द झाला. विद्यमान संचालक जगदीश बाळू बढे यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी कार्यकारी संचालकांनी खोटे दाखले देऊन माझी फसवणूक केली आहे, असे ठकसेन पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कोट
या प्रकरणात सरळ-सरळ फसवणूक झाली आहे. आपण मध्यरात्री पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे. जगदीश बाळू बढे यांच्या बिनविरोध निवडीविरुद्ध आपण न्यायालयात दाद मागणार आहोत.
- ठकसेन पाटील, तक्रारदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT