Indian Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Education : कृषी शिक्षण, संशोधनात बदल करण्यासाठी समिती

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती नेमली आहे.

Team Agrowon

Mumbai News : कृषी क्षेत्रासमोर असलेल्या नैसर्गिक आणि जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन (Agriculture Research) आणि शिक्षणात कालसुसंगत बदल करण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कार्याच्या पुनर्विलोकनासाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती नेमली आहे. पुढील ४५ दिवसांत ही समिती अहवाल देणार आहे.

महाराष्ट्राच्या कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ, अकोला, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली ही चार कृषी विद्यापीठे, तसेच एक पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कार्यरत आहेत. या विद्यापीठांत प्रभावी समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची स्थापना केली आहे.

या परिषदेचे मुख्यालय पुण्यात असून, कृषिमंत्री या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. सध्या कृषी क्षेत्र नैसर्गिक आव्हानांबरोबर जागतिक आव्हानांना सामोरे जात आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांचा अभ्यासक्रम या आव्हानांना सामोरे जाताना प्रभावीपणे समोर आला पाहिजे, यासाठी या समितीची स्थापना केली आहे.

समितीची रचना अशी...

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक सदस्य सचिव आहेत.

तर माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, माजी कृषी संचालक डॉ. सुदाम अडसूळ, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप देशमुख हे या समितीचे सदस्य आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sediment Measurement Technology: सेन्सर आधारित गाळ मापन तंत्रज्ञान

Sterile Insect Technology: फळमाशीवर मात करण्यासाठी ‘वंध्य कीटक तंत्रज्ञान’

Fodder Cultivation Technology|: सुधारित चारा वाणांसह लागवड तंत्राचाही प्रसार

Maharashtra Drought Situation: नियोजन दुष्काळ निवारण्याचे!

Nepal Natural Disaster: हिमालयाचा इशारा

SCROLL FOR NEXT