Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात गारठावाढीची शक्यता

राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेला गारठा (Cold Weather) महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानात (Minimum Temperature) उद्या (ता. १७) पासून सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांची घट होण्याचे संकेत आहेत. परिणामी राज्यातही किमान तापमानात घट होऊन गारठा (Cold) वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि गोंदिया येथे ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. पहाटे थंडी आणि दुपारी चटका ही स्थिती आहे. राज्यात सध्या किमान तापमान ११ ते २५ अंशांच्या दरम्यान आहे. उत्तरेकडील थंड व कोरडे वारे महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने उद्यापासून (ता. १७) राज्यात गारठा वाढण्याची शक्यता आहे.

पहाटे जाणवणाऱ्या गारठ्या बरोबरच धुके, दव पडणे सुरूच आहे. किमान तापमान कमी होत असतानाच कमाल तापमान ३० ते ३५ अंशांच्या आसपास कायम आहे. आज (ता. १६) राज्यात कोरड्या हवामानासह व आकाश निरभ्र राहून, किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

कमी दाब क्षेत्राचे संकेत

बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात आज (ता. १६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. वायव्येकडे सरकणारी ही प्रणाली शुक्रवारपर्यंत (ता. १८) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३१.७ (१५.४), जळगाव ३२.० (१५.७), धुळे ३१.० (११.५), कोल्हापूर ३१.६ (२०.१), महाबळेश्वर २५.६(१५.४), नाशिक ३१.१ (१५.२), निफाड ३०.४ (१२.६), सांगली ३२.२(१९.१), सातारा ३०.८(१७.४), सोलापूर ३३.३ (१८.९), सांताक्रूझ ३४.७(२०.८), डहाणू ३४.२ (२०.५), रत्नागिरी ३५.८ (२२.६), औरंगाबाद ३०.४ (१३.०), नांदेड ३३.६ (१६.०), परभणी ३१.७ (१५.२), अकोला ३२.३ (१६.०), अमरावती ३२.२ (१४.१), बुलडाणा ३०.३ (१५.७), ब्रह्मपुरी ३२.२ (१५.३), चंद्रपूर २९.६ (१५.८), गडचिरोली ३१.०(१५.०), गोंदिया ३०.०(११.५), नागपूर ३०.१ (१३.४), वर्धा ३०.० (१३.४), वाशीम ३२.८ (१६.६), यवतमाळ ३०.५ (१२.५).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT