Ajit Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar News : आता डबल इंजिन नाही ट्रिपल इंजिन सरकार; आता बुलेट ट्रेनच्या वेगाने सरकार धावेल

Maharashtra Political News : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यामुळे डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिन सरकार झालं आहे.

Team Agrowon

Ajit Pwar Oath Ceremony : अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यामुळे डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिन सरकार झालं आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे राज्य सरकार आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचे स्वागत केले.

अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी शपथ घेतली.

विकासाच्या मुद्यावर अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कर्तुत्ववान व्यक्तीला दुय्यम स्थान दिले की अशा घटना होतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्या बंडावर भाष्य केले. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लगेचच होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा आपाणास मिळाला असून तो मंजूर केला आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT