Cleanliness of water sources Agrowon
ताज्या बातम्या

Water Sources : लोकसहभागातून ३२५७ पेक्षा अधिक जलस्रोतांची स्वच्छता

Cleanliness Campaign : जिल्ह्यात ओडीएफ प्लसला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक जलस्रोतांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात ओडीएफ प्लसला गती देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक जलस्रोतांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात ३२५७ पेक्षा अधिक सार्वजनिक जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.

प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी जलस्रोतांच्या सुरक्षिततेसाठी सक्त सूचना दिल्या आहेत. ‘हरघर जल’ गाव घोषित करताना जलस्रोतांची स्वच्छता पाहिली जाते.

सोलापूर जिल्ह्यात जलस्रोतांची संख्या ९७५६ असून या मधील जवळपास ३२५७ पेक्षा अधिक जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली. या बरोबर टीसीएल ठेवण्याची जागा देखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जलस्रोताचा परिसर खराब असलेल्या ठिकाणी पावसामुळे वाढलेले गवत, कचरा हटविण्याचे काम या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली.

करमाळा, मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर व बार्शी या तालुक्यांत उत्स्फूर्तपणे जलस्रोतांची स्वच्छता करण्यात आली आहे. जलसुरक्षक तसेच प्रशिक्षित पाणी नमुने घेणारे महिला भगिनीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. हातात कुदळ, फावडे, पाटी घेऊन स्वच्छता कर्मचारी यांनी परिसराची स्वच्छता केली.

या विशेष अभियानासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात वॉर रूम तयार करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून या मोहिमेची तयारी करण्यात आली होती. प्लॅस्टिक निर्मूलन अभियानास मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादानंतर जलस्रोत स्वच्छता मोहिमेस ग्रामस्थ व कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Compartment Bunding: ओलावा संवर्धनासाठी कंपार्टमेंट बांध

Amit Shah: 'मी संसदेत उत्तर देण्यास तयार'; विरोधकांच्या गदारोळावर अमित शहांनी मौन सोडलं

Paneer Adulteration Action: भेसळखोरांवर मकोका; अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

Sugarcane Variety: रसवंतीसाठी ऊस जात : कोव्हीएसआय ०३१०२

Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान

SCROLL FOR NEXT