Chandwad APMC Agrowon
ताज्या बातम्या

Chandwad APMC : चांदवड बाजार समिती संचालकाने बैठक भत्ता नाकारला

Nashik Bazar Samiti : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी बाजार समितीचा मिळणारा मासिक बैठक भत्ता नाकारला आहे.

Team Agrowon

Nashik Bazar News : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी बाजार समितीचा मिळणारा मासिक बैठक भत्ता नाकारला आहे. याबाबत त्यांनी सभापती यांना लेखी पत्र दिले आहे. त्यांच्या या निर्णयाचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे. एकीकडे शेतकरी अडचणीत आहे; त्यामुळे मिळणारा अधिकचा भत्ता कशाला, असे सांगत निंबाळकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

समितीच्या २१ जुलैच्या मासिक बैठकीनंतर निंबाळकर यांना समितीकडून ८८० रुपये मासिक बैठक भत्ता देऊ केला. मात्र घरापासून चांदवड येथील बाजार समिती कार्यालयात येण्यासाठी एवढा खर्च अधिकचा आहे. त्यामुळे मी नम्रपणे नाकारत आहे, माझ्या नावाने पुढील काळात अशी तरतूद होऊ नये, याबाबतचे लेखी पत्र समितीकडे दिले.

समितीच्या मासिक भत्त्यामध्ये ८८० रुपये देय आहेत. त्यामध्ये ४५० रुपये दैनिक भत्ता, ३७५ रुपये बैठक भत्ता व ५५ रुपये प्रवास भत्ता अशी तरतूद असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. याबाबत त्यांनी सचिवांना विचारले असता त्यांनी सविस्तर सांगितले नाही. तर समितीने भत्त्यासंबंधी तरतुदी केल्या असून उपविधीमध्ये त्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितल्याचे निंबाळकर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT