Heavy Rains Agrowon
ताज्या बातम्या

राज्यात वादळी पावसाची शक्यता

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. ३०) तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळमध्ये दाखल झाला आहे. यातच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाले आहे. तापमानात चढ-उतार सुरू असून, उकाडाही वाढला आहे. आजपासून (ता. ३०) राज्यात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही कमाल तापमानात वाढ, घट होत आहे. कोकणात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश, मध्य महाराष्ट्रात २८ ते ३९ अंश, मराठवाड्यात ३८ ते ४० तर विदर्भात ३९ ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे.

केरळ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य राजस्थानपासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आजपासून (ता. ३०) तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.४, धुळे ४०, जळगाव ४०, कोल्हापूर ३३.८, महाबळेश्‍वर २७.६, नाशिक ३४.२, निफाड ३५, सांगली ३५.२, सातारा ३४.१, सोलापूर ३८.२, सांताक्रूझ ३४.८, रत्नागिरी ३३.२, औरंगाबाद ३८, परभणी ३९.४, नांदेड ४०.२, अकोला ४०.९, अमरावती ४०.६, बुलडाणा ३९, ब्रह्मपुरी ४१.८, चंद्रपूर ४४, गोंदिया ४१.२, नागपूर ४२, वर्धा ४१.८, यवतमाळ ४०.७.

वादळी पावसाचा इशारा :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मध्य प्रदेश : उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली.

विदर्भ : नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: डोळ्यांसमोर पाणी, पण वीज नसल्याने पिके कोमेजली

Buldhana District Bank: बुलडाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. राजेंद्र शिंगणे

Groundwater Conservation: भूजल संरक्षण, पुनर्भरण ही सामूहिक जबाबदारी

Akola Drought Condition: अकोल्यातील १३ मंडलांवर दुष्काळाची गडद छाया

India Protein Demand: देशात २०७० पर्यंत प्रथिनांचा वापर तिपटीने वाढणार; कडधान्यांची मागणी वाढेल?

SCROLL FOR NEXT