Power Supply Fails: विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही शेतीपंपांना वीजपुरवठा होत नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी, सोयाबीनसह खरीप पिके हातातून जाण्याची भीती निर्माण झाल्याने १५ गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. ९) मंगरूळ नवघरे येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन केले..चिखली तालुक्यातील दहिगाव, मंगरूळ नवघरे, पांढरदेव, घानमोड, मानमोड, करतवाडी, वरखेड, नायगाव खुर्द व बुद्रुक, पेनसावंगी, सावरखेड, दहिगाव शिवारातील उत्रदा यांसह १५ गावांमधील शेतीपंपांचा वीजपुरवठा ठप्प आहे..Agriculture Crisis : पाऊस गायब, कालवाही कोरडा अन् पिके तहानलेली.त्यामुळे विहिरीत पाणी असूनही ते पिकांना देता येत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.आंदोलनस्थळी शेतकरी आक्रमक झाल्याने पोलिस प्रशासनाने मध्यस्थीची भूमिका घेतली..Electricity Supply Issues: शेतकरी अडचणीत; पिके करपत असताना सिंचनासाठी वीज नाही, लोडशेडिंगवरुन खासदार ओमराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र .या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, बाजार समितीचे संचालक संतोष वाकडे, शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले..फीडरवरील अतिरिक्त भार कमी करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महावितरणने मागण्यांची पूर्तता करून वीजपुरवठ्याची समस्या सोडविली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.