Chana Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Chana Cultivation : बुलडाण्यात हरभरा लागवड होणार दोन लाख हेक्टरवर

रब्बी हंगामासाठी यंदा परतीचा पाऊस पावला असून, खरिपात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : रब्बी हंगामासाठी (Rabi Season) यंदा परतीचा पाऊस पावला असून, खरिपात झालेल्या नुकसानाची भरपाई (Crop Damage) करण्यासाठी शेतकरी कामाला लागला आहे. त्यामुळेच रब्बी हंगाम या वर्षात किमान तीन लाख हेक्टरवर (Rabi Sowing) पोहोचू शकतो. यामध्ये सर्वाधिक हरभऱ्याची लागवड (Chana Cultivation) अपेक्षित आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, त्यानंतर मक्याची अधिक क्षेत्रावर लागवड होत असते. या हंगामासाठी जमिनीत पुरेशी ओल तयार झालेली आहे. विहिरींमध्येही तुडुंब पाणी आहे. प्रकल्पाधारित सिंचन होणाऱ्या भागात कालव्याने पाणी मिळेल इतका साठा तयार झालेला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचा पेरा गेल्या काही वर्षांत वाढत चाललेला आहे.

या वर्षी ही लागवड किमान तीन लाख १० हजार हेक्टरपर्यंत पोहोचू शकते. यात प्रामुख्याने हरभरा दोन लाख १८ हजार ३०० हेक्टर, रब्बी ज्वारी १०,७३५, करडई दीड हजार, मका २०,७८० हेक्टर, तर गव्हाची लागवड ५५ हजार हेक्टरवर होऊ शकते. जिल्ह्यात हरभरा, गहू, मका या तीन पिकांचीच प्रामुख्याने लागवड होणार असल्याचे गृहीत धरत बियाणे, खतांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये खरिपात सोयाबीनची लागवड केली जाते. सोयाबीन काढून नंतर रब्बीत शेतकरी हरभऱ्याचे पीक घेतात.

मका लागवड स्थिरावली

गेल्या काही वर्षांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर शेतकरी आता दुसऱ्या पिकांकडे वळतील, असे असतानाही जिल्ह्यात विदर्भात सर्वाधिक मका लागवडीचे क्षेत्र राहते. या हंगामात सुमारे २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची पेरणी गृहीत धरण्यात आली आहे. मागील काही हंगामांपासून मक्याची लागवड स्थिरावत आहे.

वर्षभर मक्याचा दर हमीभावापेक्षा अधिक मिळत आलेला आहे. त्यामुळे हे क्षेत्र थोडे कमी-अधिक होण्याची शक्यताही आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आतापर्यंत पाच हजार १४ शेतकऱ्यांना ४३ कोटी ८९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. दरम्यान, यंदा ५१ हजार ५०० शेतकऱ्यांना ६०० कोटी रुपयांचे पीककर्ज हवे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT