Food Wastage | Organic Farming | Agriculture Productivity Agrowon
ताज्या बातम्या

Food Wastage : उत्पादकतेचे नाही तर नासाडी रोखण्याचे आव्हान

जगात आजच्या घडीला शेतमालाची उत्पादकता हा गंभीर प्रश्‍न नसून अन्नधान्याची नासाडी रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः जगात आजच्या घडीला शेतमालाची उत्पादकता (Agriculture Productivity) हा गंभीर प्रश्‍न नसून अन्नधान्याची नासाडी (Food Wastage) रोखण्याचे मोठे आव्हान आहे. परिणामी सेंद्रिय शेतीपद्धतीत (Organic Farming) शेतमालाची उत्पादकता कमी होते किंवा अशा शेतमालाला कमी दर मिळतो, असे सांगत या शेतीपद्धतीला विरोध करणे संयुक्तिक नसल्याची माहिती मूळच्या फ्रान्स येथील रहिवासी इकोसर्टच्या भारतीय समन्वयक रोझेन रिचर्ड यांनी दिली.

रोझेन म्हणाली, वाढता ताणतणाव तसेच विषांशयुक्‍त अन्न, फास्टफूड संस्कृतीचा अंगीकार या कारणांमुळे मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. परिणामी सेंद्रिय किंवा रेसीड्यू फ्री शेतमालाला जागतिकस्तरावर मागणी वाढली आहे. परंतु असा शेतमाल प्रमाणित केला जात नाही.

त्यामुळे सहज बाजारपेठ मिळविणे शक्‍य होत नाही किंवा अशा शेतमालाला दर कमी मिळतो. त्याच कारणामुळे असा शेतमाल प्रमाणीकरण करण्यावर भर दिल्यास ग्राहकांमध्ये देखील विश्वासार्हता वाढविणे शक्‍य होणार आहे. भारतात सध्या २६ प्रमाणीकरण संस्था आहेत. फ्रान्स मुख्यालय असलेल्या ‘इकोसर्ट’चे प्रमाणीकरणासाठी सध्या १६५ देशात काम होत आहे.

त्यामध्ये भारताचाही समावेश आहे. भारतीय शेतीपद्धतीत तणनाशकांचा वापर नजीकच्या काळात वाढला आहे. त्याचे दूरगामी परिणामी शेतीपद्धतीवर होतील. त्यामुळे ग्लायफोसेटसारख्या तणनियंत्रकांच्या वापराबाबत विचार झाला पाहिजे. जमिनीची टणकता वाढणे, पाण्याचे प्रदूषणात होणारी वाढ, अशा समस्या तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवतील, परिणामी त्याबाबतही विचार झाला पाहिजे.

भारतात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु जगाच्या तुलनेत सेंद्रिय प्रमाणित शेतीखालील क्षेत्र मात्र कमी आहे. प्रमाणीकरण वाढविल्यास जागतिक किंवा स्थानिकस्तरावर मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. त्याकरिता प्रयत्न होण्याची गरज आहे.

- रोझेन रिचर्ड, इकोसर्ट, समन्वयक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

All Party Meeting Demands: महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट; सर्वपक्षीय बैठक बोलवा : विजय वडेट्टीवार

Legislative Council Election Result: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी

SCROLL FOR NEXT