Food Processing Agrowon
ताज्या बातम्या

Food Processing: प्रक्रिया उद्योगासाठी अर्ज करण्याचे आवाहन

उत्पादनाबाबत पुरेसे ज्ञान व किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. एखादा शेतकरी किंवा शेतकरी गट (Farmers Group) एकत्र येऊन शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतात.

ॲग्रोवन वृत्तसेवा

पुणे : केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (Food Processing) योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येते. योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या प्रकल्पास खर्चाच्या ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. योजनेचे निकष बदलण्यात आले असल्याने अन्न प्रक्रियेसंदर्भातील (Food Processing) इतर उद्योगांनाही आता अनुदान मिळणार आहे.

बारामती उपविभागात आतापर्यंत बारामती तालुक्यात ४४, दौंड तालुक्यात ५३, इंदापूर तालुक्यात ४२ व पुरंदर तालुक्यात २१ असे एकूण १६० प्रकल्पांचे अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामध्ये १६ प्रकल्पांचे बँक कर्ज मंजूर झालेले आहे. ३८ प्रकल्पांचे बँक कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे.

अशी आहे योजना ---

योजनेत शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहभाग घेता येतो. उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांच्या नवीन उद्योगांना प्राधान्य दिले जाते.

उद्योगांची उलाढाल किमान १ कोटी रुपये असावी. सध्याच्या उलाढालीपेक्षा अधिक किमतीचा प्रस्ताव असू नये. उत्पादनाबाबत पुरेसे ज्ञान व किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. एखादा शेतकरी किंवा शेतकरी गट (Farmers Group) एकत्र येऊन शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग उभारू शकतात.

शेतकरी, उत्पादक गट कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था यांनी योजनेत सहभाग नोंदवून लाभ घ्यावा. अर्ज व अन्य माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT