Department Of Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Award : कृषी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कृषी विभागामार्फत गेल्या २०२२ वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागामार्फत (Agriculture Department) गेल्या २०२२ वर्षामध्‍ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्‍या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषी पुरस्कारांसाठी (Agriculture Award) प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

शेतकरी, गट, संस्था, व्यक्ती यांनी विविध कृषी पुरस्कार प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे येत्या ३० जूनपर्यंत सादर करावेत, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्‍हाण यांनी केले.

कृषी विभागामार्फत राज्यात कृषी आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, कृषी उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट यांना विविध प्रकारचे कृषी पुरस्कार देण्यात येतात.

यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, सेंद्रिय शेती कृषिभूषण, उद्यान पंडित, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, युवा शेतकरी पुरस्कार व कृषी विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,

कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येते. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Deficit : सप्टेंबरमध्ये तीन वर्षांनंतर सरासरीपेक्षा कमी पाऊस

Niphad Drought : निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना, सवलती लागू करा

Zilla Parishad : ‘जि. प.’ने दुष्काळासाठी विशेष सभा घ्यावी

Farmers Demand: उसाला ६५०० रुपये दर जाहीर करा

Maharashtra Rainfall : ५६ महसूल मंडलांत निम्म्याहून कमी पाऊस

SCROLL FOR NEXT