Increase in leopard attacks 
ताज्या बातम्या

Leopard Attack : चित्रीत बिबट्याच्या हल्ल्यात बैल मृत्युमुखी

आजरा तालुक्याच्या चित्री परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. या परिसरात त्याच्याकडून पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले होत आहेत. या वाड्यावरील धोंडिबा कोकरे यांचा बैलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

Team Agrowon

आजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्याच्या चित्री परिसरात बिबट्याने दहशत (Leopard Terror) माजवली आहे. या परिसरात त्याच्याकडून पाळीव प्राण्यांच्यावर हल्ले होत आहेत. या वाड्यावरील धोंडिबा कोकरे यांचा बैलाचा बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मृत्यू झाला. या परिसरातील ही दुसरी घटना असून बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत वावरत आहे.

मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर या परिसरात आहे. याचे दर्शन अनेकदा शेतकऱ्यांना झाले आहे. तो आवंडी व चित्री परिसरात वावरत आहे. त्याने कोकरे यांच्या शेतामध्ये चरत असलेल्या आठ वर्षीय बैलावर हल्ला केला.

त्यात त्याचा मृत्यू झाला. या बैलाचा पाठीमागील कमरेचा भाग बिबट्याने फस्त केला आहे. बैलाच्या हंबरड्याने परिसरात काम करीत असलेले शेतकरी व ग्रामस्थ धावत घटनास्थळी आले. तोपर्यंत बिबट्या पसार झाला होता.

वनपाल संजय निळकंठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, देऊळवाडी येथील एका घरासमोर बांधलेले कुत्रे चार दिवसांपूर्वी बिबट्याने पळवून त्याचा फडशा पाडला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा

Jalna Nanded Highway: जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा

Bacchu Kadu Joins Shiv Sena: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर

Soytbean Rate: सोयाबीनचा ६ हजारांचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT