Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe News : लाचखोर तलाठ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

शेतजमीन खरेदी केलेल्या सात-बारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या तत्कालीन तलाठ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Team Agrowon

Bribe News सोलापूर : शेतजमीन (Agriculture Land) खरेदी केलेल्या सात-बारा उताऱ्यावर (Satrbara) नाव लावून देण्यासाठी लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या तत्कालीन तलाठ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्या. श्रीमती रेखा पांढरे यांनी यासंबंधीचा आदेश दिला.

रामकिसन किन्हाळकर असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये पाच वर्षे सक्तमजुरी कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की यातील तक्रारदार यांनी लिंबी चिंचोळी (ता. दक्षिण सोलापूर) शिवारात शेतजमीन खरेदी केलेल्या सात-बारा उताऱ्यावर नाव लावून देण्यासाठी तक्रारदार यांना तत्कालीन तलाठी रामकिसन पंडितराव किन्हाळकर यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यावरून तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरकडे संपर्क साधला असता लाचलुचपत विभागाकडून सापळा लावण्यात आला. त्यामध्ये किन्हाळकर यांना लाच स्वीकारल्यानंतर पकडण्यात आले होते.

सदर गुन्ह्याचा तपास विश्‍वनाथ सिद तत्कालीन पोलिस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांनी करून किन्हाळकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. यात परिस्थितिजन्य साक्षीपुरावे पाहून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे अॅड. अल्पना कुलकर्णी, तर आरोपीतर्फे अॅड. आश्‍विनी कुलकर्णी यांनी काम पाहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : पावसाची तूट, पेरणीला फटका; कापूस आणि सोयाबीन लागवड पिछाडीवर

Goat Farming: शेळीपालनातून मिळविले आर्थिक स्थैर्य

Farmer Success Story: गावरान लसूण उत्पादनातून मिळविली वेगळी ओळख

Environmental Conservation: वृत्तांत उप्पुगल गाव भेटीचा!

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

SCROLL FOR NEXT