Bribe  Agrowon
ताज्या बातम्या

Amravati Bribe News : नाहरकत प्रमाणपत्रासाठी सरपंचाने स्वीकारली लाच

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणारे नाहरकत प्रमाणपत्र देखील भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.

Team Agrowon

Amaravati Bribe Arrest अमरावती : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणारे नाहरकत प्रमाणपत्र देखील भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे.

असाच एक प्रकार चांदूर बाजार तालुक्‍यातील कारंजा बहिरम गावात उघडकीस आला आहे.

नाहरकत प्रमाणपत्रासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला ‘एसीबी’ने रंगेहात पकडले.

रमेश गणेश मोहोड ( रा. कारंजा बहिरट), असे ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकलेल्या सरपंचाचे नाव आहे. बुधवारी (ता. १) सायंकाळी चारनंतर बहिरट येथील कारंजा नाका परिसरात अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा सापळा रचला.

समर्थ फाउंडेशनचे संचालकांनी संस्थेमार्फत यात्रेत लावणीनृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कारंजा बहीरम यांच्याकडे परवानगी मागितली होती. नाहरकत प्रमाणपत्रासाठी सरपंच मोहोड यांनी या संचालकांकडे १ हजार रुपयांची लाच मागितली होती.

पैसे देण्यापूर्वी संबंधित संचालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार ‘एसीबी’ने हा सापळा रचला. सरपंच मोहोड यांनी पैसे स्वीकारताच त्यांना अटक झाली.

पोलिस निरीक्षक अमोल कडू, योगेशकुमार दंदे, माधुरी साबळे, विनोद कुंजाम, शैलेश कडू, सतीश किटुकले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India US Trade Deal : भारत-अमेरिका व्यापार करारावर एकमत नाही; शेतीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर भारत ठाम

Land Acquisition: परिक्रमा मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पारदर्शकपणे राबवविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Agricultural Export: कृषी निर्यातविषयक क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन

Rain Andaj: राज्यात पावसाची उघडीप; पुढील पाच दिवसांचा अंदाज काय?

Wild Animals Crop Damage: कोवळी पिके वन्य प्राण्यांकडून फस्त

SCROLL FOR NEXT