Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : मराठवाड्यात कृषीच्या गतिमानतेला ग्रहण

राज्याचे कृषिमंत्रीपद मराठवाड्याच्या वाट्याला आले. परंतु, या विभागातील कृषी विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदेच महिनोंमहिने रिक्त आहेत.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे कृषिमंत्रीपद (Agriculture Minister) मराठवाड्याच्या वाट्याला आले. परंतु, या विभागातील कृषी विभागातील (Agriculture Department) महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदेच महिनोंमहिने रिक्त आहेत.

खुद्द कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जिल्हा अधीक्षक पदाचा प्रभार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे.

जालन्यात ज्यांच्यावर प्रभारी जबाबदारी आहे, तेही मार्चअखेर निवृत्त होत आहेत. त्यामुळे कृषीच्या गतिमानतेलाही ग्रहण लागल्याची स्थिती आहे.

केवळ कृषिमंत्री पदच नव्हे तर सहकार, रोजगार हमी व फलोत्पादन ही महत्त्वाची खाती मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरच्या वाट्यावर आहेत.

तसेच केंद्र सरकारमधील अर्थराज्यमंत्री व रेल्वे राज्यमंत्री अशी मंत्र्यांची खातीही मराठवाड्यातील उद्योग नगरी व राजधानीच्या वाटेवर असल्याचे सांगायला आहे.

परंतु या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच कृषी अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदेच महिनोंमहिने रिक्त आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा भार जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्याच्या खांद्यावर आहे.

लातूर कृषी विभागात पाच जिल्ह्यांत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर आहेत. त्यापैकी चार भरली आहेत. धाराशिव तसेच लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पद रिक्त आहे.

कृषी विकास अधिकाऱ्यांची पाच पैकी तीनच पदे भरली असून दोन रिक्त आहेत. उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या मंजूर १० पैकी निम्मी ५ पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकाऱ्यांच्या मंजूर १०३ पदांपैकी केवळ ६१ भरली आहेत.

तब्बल ४२ पदे रिक्त आहेत. याशिवाय वर्ग दोन कनिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या मंजूर १९८ पदांपैकी १४८ पदे भरली आहेत. ५० पदे रिक्त आहेत.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत वर्ग-१ ची २९ पदे मंजूर असताना केवळ नऊ पदे भरली. तर तब्बल २० पदे रिक्त आहेत. वर्ग-२ च्या मंजूर ६९ पदांपैकी ३५ पदे भरली असून तब्बल ३४ पदे रिक्त आहेत.

याशिवाय कनिष्ठ वर्ग-२ ची १६४ पदे मंजूर असताना १०७ पदे भरली आहेत तर तब्बल ५७ पदे रिक्त आहेत. आत्मा यंत्रणेतील प्रकल्प संचालकांची तीन पदे रिक्त आहेत. उपसंचालकांची सर्व सहाही पदे रिक्त आहेत.

विभागातील तिन्ही जिल्ह्यांत कृषीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे योजनांच्या अंमलबजावणीत अडचणी येतात. महत्त्वाची रिक्त पदे भरावीत, यासाठी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवर व शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.

- डॉ. डी. एल. जाधव, विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT